Join WhatsApp group

deshmukhsir

जनजागृती असंघटीत बांधकाम मजुर संघटनेच्या पाठपुराव्याला यश- आता पूर्वीप्रमाणेच बांधकाम मजुरांना ९० दिवसांचे बांधकाम प्रमाणपत्र मिळणार

अकोला – बांधकाम मजुरांना ९० दिवसांचे बांधकाम प्रमाणपत्र द्या अशी मागणी जनजागृती असंघटीत बांधकाम मजुर संघटनेच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती, त्या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी यामध्ये दिशानिर्देश देत अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त (प्रशासन) गिता ठाकरे यांनी अमनपा/साप्रवि/आस्था/685/2025 दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी पत्रान्वये चारही झोनला आदेशित करुन पुन्हा बांधकाम प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत….

Read Full News

अकोट तालुक्यातील अंबोडा ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन न झाल्याने वादंग

अकोट (जि. अकोला) : शासन निर्णयानुसार १५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामसभेचे आयोजन करणे अनिवार्य असूनही अकोट तालुक्यातील अंबोडा ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रविण श्रीकृष्ण बायवार या ग्रामपंचायत सदस्यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलमानुसार ग्रामसभेचे आयोजन करणे बंधनकारक आहे….

Read Full News

अतिवृष्टी सर्व्हे दरम्यान कृषी अधिकाऱ्यावर हल्ला – जिवे मारण्याची धमकी

पिंजर: बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुधलम गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गेलेल्या सहायक कृषी अधिकारी कैलास वसंतराव बोधडे यांच्यावर गावातील दोन व्यक्तींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर तक्रार नोंदविण्यात आली आहे. दि. 24 ऑगस्ट रोजी सादर केलेल्या लिखित तक्रारीत बोधडे यांनी म्हटले आहे की,…

Read Full News

पत्रकार लोकशाही बळकट करण्यासाठी बहूमोल कर्तव्याची भुमिका पार पाडू शकतात. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक

अकोला* — पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे.गुन्हेगारीचे उच्चाटन करून समाज संरक्षण आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार,समाज आणि पोलिसांच्या विधायक समन्वयाची वाटचाल हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण आहे. पत्रकार,समाज आणि पोलिस या समन्वयातून अपेक्षित कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देतांना त्यांनी पत्रकारांमुळेच आम्हाला गुन्हेगारांची आणि घटनांची माहिती होते.ऑपरेशन प्रहारमधून दोन महिण्यात २ कोटीचा मुद्देमाल…

Read Full News

होली क्रॉस कॉन्व्हेंटच्या गैरव्यवहारावर पडदा उघडा– रणजीत राठोड

अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड यांनी शासनाद्वारे अनुदानित होली क्रॉस कॉन्व्हेंट शाळेविरोधात गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इयत्ता चौथी ते पाचवी प्रवेश प्रक्रियेत शाळा प्रशासनाकडून पालकांकडून तब्बल १० ते २० हजार रुपयांपर्यंत भरमसाठ डोनेशन घेतले जाते. यातील महत्त्वाची बाब म्हणजे या डोनेशनची कोणतीही पावती पालकांना…

Read Full News

गायरान धारकांना कायम पट्ट्यांची मागणी –अन्यथा २० सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

अकोला जिल्ह्यातील अनुसुचित जाती-जमाती तसेच भटक्या विमुक्त समाजातील भूमिहीन गायरान धारक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयानुसार तसेच दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार गायरान धारकांना जमिनीचे कायम पट्टे मिळणे अपेक्षित असताना, अद्यापही शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत.गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी ई-क्लास व एफ-क्लास गायरान जमिनी…

Read Full News

महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना अकोला पदाधिकाऱ्यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

अकोला१८ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने सादर केलेल्या उपोषण नोटीसवर विभाग नियंत्रक,अकोला यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली होती व चर्चेअंती उभयपक्षी मान्य केल्याप्रमाणे दिनांक:-२३ ऑगस्ट २०२५ पर्यंत अकोला विभागातील प्रथम टप्पा खातेमार्फत बढती परीक्षा पास वाहकांना वाहतूक नियंत्रकपदी पदोन्नतीचे आदेश देण्यात येईल व इतर पदोन्नतीची कारवाई टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात…

Read Full News

कापशी रोड येथे कृत्रिम पाणीटंचाई – ग्रामस्थांचा रोष, आंदोलनाचा इशारा 💧✊

कापशी रोड (वार्ताहर) :कापशी येथील तलाव, बंधारे तुडुंब भरलेले असूनही नळांना पाणी नाही, नागरिकांना तहानलेले ठेवून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणाऱ्या प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. दररोज थेंबाथेंब पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत असून, काही भागात तर दिवसन्‌दिवस पाणीपुरवठा बंद आहे. दुसरीकडे पाणीपट्टी मात्र जबरदस्तीने वसूल केली जाते. “पाणी नाही तर कर नाही!” अशा घोषणा…

Read Full News

खोळद येथील पेढी नदिमध्ये वाहून गेलेल्या युवकाचे शोधकार्य करण्यास बचाव पथक यशस्वी

मूर्तिजापूर तालुक्यातील खोळद येथील रहिवासी दि.22 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान शंतनु अविनाश मानकर (23) रा.खोळद आपली बैल जोडी घेऊन पेढी नदीवर गेले असता वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज पहाटे घडली त्यानुसार तहसीलदार मुर्तीजापुर यांच्या सूचनेवरून शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे,नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या युवकाला शोध घेण्यासाठी पाचारण करण्यात…

Read Full News

जय भवानी मित्र मंडळाची केदारनाथ ते राजराजेश्वर नगरी कावडयात्रा

अकोला – भगवान शिवशंकराची लिला अपरंपार आहे. भगवान भोलेनाथ हे भक्तांच्या हाकेला नेहमी धावून आले असल्याची अनेक आख्यायिका आहेत. त्याचाच एक प्रत्यय हा अकोला येथील ­हरिहर पेठ स्थित जय भवानी मित्र मंडळाने थेट केदारनाथवरुन जल आणून त्याचा जलाभिषेक हा अकोल्यातील राजराजेश्वर महाराजांना करुन एक विक्रम करुन त्यांना आलेला आहे. बारा ज्योर्तिलिंगामधील एक असलेल्या श्री क्षेत्र…

Read Full News