Join WhatsApp group

आषाढी वारीच्या भक्तिरंगात रंगली ‘भक्ती सुमने’ मैफलप्रा. देवेंद्र देशमुख यांच्या अभंगगायनाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाला; रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

अकोला, प्रतिनिधी : आषाढी वारीचे औचित्य साधून स्थानिक तरुणाई फाउंडेशन, कुटासा आणि स्वरांजली संगीत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संताजी नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात आयोजित ‘भक्ती सुमने’ या सांगीतिक अभंग मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रा. देवेंद्र देशमुख यांच्या ओजस्वी अभंगगायनाने संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.

आषाढी वारी आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेला साजेशा या संगीत कला सांस्कृतिक कार्यक्रमात संत साहित्यावर आधारित विविध अभंग, भक्तिगीते आणि विठ्ठलनामाचा गजर सादर करण्यात आला. प्रा. देवेंद्र देशमुख यांनी सुमधुर आवाजात संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आदी संतांच्या अभंगांना सुरेल स्वरांत सादर करत उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले.
महाेत्सवात प्रा. देवेंद्र एन देशमुख व कविता वरघट यांना ऑर्गनवर मनाेज राउत तर हार्माेनियमवर रवींद्र कसबेकर, तबला भास्कर पाटील व लोकेश अवचार यांची साथसंगत लाभली. निवेदन डाॅ. प्रवीण देशमुख यांनी केले. विटे वरी उभा विठ्ठल. रखुमाई रखुमाई. देव माझा विठू सावळा.माऊली माऊली. चंद्र भागेच्या तीरी उभा मंदिरी पांडुरंग हरी अश्या अनेक भक्ती गीताने भक्ति रसात रसिक न्हाऊन निघाले. भक्ती ना लट. आर्या कुलकर्णी श्ररा नागलकर शुभा वानखडे अधी श्री सोळंके यश्री शेळके आदी नी गिते सादर करून रसिकाची मने जिकली.

कार्यक्रमाला परिसरातील वारकरी, संगीतप्रेमी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठलभक्ती, अभंग परंपरा आणि सांगीतिक सादरीकरणाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमाने आषाढी एकादशीचा भक्तिमय आनंद द्विगुणित केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक तरुणाई फाउंडेशन, स्वरांजली संगीत महाविद्यालय तसेच विठ्ठल रुखमिनी मंदिर संताजी नगर अकोला चे सर्व संचालक मंडळा ने अधक परिश्रम घेतले. उपस्थितांनी अशा सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *