Join WhatsApp group

कापशी रोड येथे कृत्रिम पाणीटंचाई – ग्रामस्थांचा रोष, आंदोलनाचा इशारा 💧✊

Oplus_16777216

कापशी रोड (वार्ताहर) :
कापशी येथील तलाव, बंधारे तुडुंब भरलेले असूनही नळांना पाणी नाही, नागरिकांना तहानलेले ठेवून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणाऱ्या प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला आहे.

दररोज थेंबाथेंब पाण्यासाठी महिलांना त्रास सहन करावा लागत असून, काही भागात तर दिवसन्‌दिवस पाणीपुरवठा बंद आहे. दुसरीकडे पाणीपट्टी मात्र जबरदस्तीने वसूल केली जाते. “पाणी नाही तर कर नाही!” अशा घोषणा देत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.

👉 “कापशी तलावात पाण्याचा मुबलक साठा असूनही लोकांना टंचाईत ढकलणं म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणं आहे. जर तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

ग्रामस्थांच्या वाढत्या आक्रोशाकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास कापशी रोडवर मोठं जनआंदोलन पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.

💧 गावकऱ्यांचा जाहीर इशारा – “पाणी मिळालंच पाहिजे, अन्यथा आंदोलन अटळ!”

Oplus_16777216

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *