Join WhatsApp group

राष्ट्रीय शाळेत माजी विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांचे आगळे वेगळे स्वागत…..

अकोला :- स्थानिक टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळा उमरी मोठी येथे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरला शाळेतील चिमुकल्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी स्कूल बॅग, वॉटर बॅग, मिठाई, चॉकलेट पुष्पगुच्छ भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता याच सोबत राष्ट्रीय शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांचा…

Read Full News

शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

कोठारी बु., ता. पातूर, जि. अकोला | प्रतिनिधीनवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाबद्दल प्रेम, जबाबदारी आणि संवर्धनाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोठारी बु. येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी युवा लोकचळवळ यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. “शाळेची सुरुवात… हिरवाईची नांद!” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचा…

Read Full News

शिरताळा येथे ‘श्रीमद् भागवत कथा व हरिनाम सप्ताहा’चे आयोजन

मुर्तिजापूर – तालुक्यातील शिरताळा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महंत १००८ सिताराम महाराज यांच्या कृपेने व श्री वै. समर्थ सद्‌गुरु श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त ‘श्रीमद् भागवत कथा व हरिनाम सप्ताहा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम सखारामपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह हनुमान मंदिर, शिरताळा येथे पार पडणार आहे. या आध्यात्मिक महोत्सवाचा शुभारंभ…

Read Full News

बुद्ध पौर्णिमेनिमित्त सम्यक सिद्धार्थ मंडळाचा भोजनदान व भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात

गोठी उमरी येथे सम्यक सिद्धार्थ व्यायाम, क्रीडा, शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा, १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे रजिस्ट्रेशन क्रमांक एफ. १७५०७ असून या निमित्ताने भोजनदान तसेच भीमगीतांच्या कार्यक्रमाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला उमरी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक तसेच…

Read Full News

अकोला महानगरपालिकेच्या जनगणना प्रशिक्षणात मोठा गोंधळअनेक कर्मचाऱ्यांना नाश्ता-जेवणच नाही

अकोला : अकोला महानगरपालिका मार्फत सुरू असलेल्या जनगणना २०२६-२७ प्रशिक्षणात आज गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना साधा नाश्ता आणि दुपारचे जेवणही उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.महानगरपालिकेने पूर्वीच काढलेल्या अधिकृत दरपत्रक सूचनेनुसार प्रशिक्षण कालावधीत कर्मचाऱ्यांना दररोज दोन वेळा चहा, सकाळी नाश्ता आणि दुपारचे भोजन देण्याची तरतूद…

Read Full News

अकोला जिल्ह्यात मनसेला नवसंजीवनी देणार -मा हेमंतजी गडकरी

अकोट दि 8/04/2026 बुधवार रोजी अकोट येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा नवनिर्वाचित अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष मा. हेमंतजी गडकरी यांनी मनसे अकोट विधानसभेची आढावा बैठक घेतली.अकोला जिल्हा संपर्क अध्यक्ष झाल्या नंतर त्यांनी अकोला जिल्ह्याचा दौरा सुरु केला असून त्यांनी पक्षाची नवीन बांधणी सुरु केली असून गाव तिथे शाखा घर तिथे…

Read Full News

“प्रशासनात अदृश्य ताकद? बदलीनंतरही बदल नाही!”जिल्हा परिषदेत बदली आदेश धाब्यावर? वर्षभरापासून कर्मचारी जुन्याच ठिकाणी कार्यरत

अकोला : शासनाकडून स्पष्ट बदली आदेश देऊनही एका कर्मचाऱ्याने वर्षभरापासून मूळ ठिकाणीच ठाण मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनातील शिस्त आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली होती. आदेशानुसार त्यांना तात्काळ कार्यमुक्त होऊन नव्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात तसे…

Read Full News

उमरी येथे नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

उमरी (दि. २९ मार्च २०२६, रविवार) : सम्यक सिद्धार्थ बहु. मंडळ, उमरी मोठी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवकाचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. सम्यक सिद्धार्थ बहु. मंडळाचे अध्यक्ष शरदभाऊ इंगोलेया कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री संदीप शेगोकार, सौ. शिल्याताई वरोकार तसेच व-सौ. पल्लवीताई गावडे व संदीपभारू गावडे यांचा शाल व…

Read Full News

देशाची व घराची रक्षण करणारी म्हणजे स्त्रीजागतिक महिला दिनानिमित्त

डॉ. खुशबू चोपडे यांचा सन्मान स्वागतअकोला:-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्वयंसिद्धा असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या राज्य प्रमुख तथा अध्यक्षा डॉ. खुशबू चोपडे यांचा सन्मान व विशेष स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. सुहासिनीताई धोत्रे , मा. महापौर शारदाताई खेळकर, महानगरपालिका झोनचे सर्व सभापती, नगरसेवक, पदाधिकारी यांनी केले होते.या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणासाठी होत…

Read Full News

मुख्यालयात नसतानाही कागदावर हजेरी – आरोग्य सेवकांचा भांडाफोड; कारवाई न झाल्यास आमरण उपोषण

अकोला | जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत काही आरोग्य सेवक मुख्यालयात राहत नसतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहत असल्याची खोटी माहिती देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आकाश कोकाटे यांनी केला आहे.नियमाप्रमाणे आरोग्य सेवकांना आपल्या कार्यक्षेत्राच्या मुख्यालयात राहणे बंधनकारक असताना काही जण मात्र…

Read Full News