योग चळवळीला नवे बळ! महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या दमदार नियुक्त्या जाहीर
अकोला प्रतिनिधी :महाराष्ट्रात योग चळवळीला नवसंजीवनी देणारा मोठा निर्णय समोर आला असून महाराष्ट्र योग शिक्षक संघाने आपल्या संघटनात्मक बांधणीला अधिक भक्कम करण्यासाठी महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अमरावती विभागप्रमुखपदी डॉ. चंद्रकांत अवचार यांची निवड करण्यात आली असून अकोला जिल्हाध्यक्षपदी डॉ. उल्हास मोकळकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेला नवे नेतृत्व मिळाले आहे.संघाचे संस्थापक…
