Join WhatsApp group

सेवेला सलाम! बाळापूर, बार्शीटाकळी व पातूर पंचायत समितीतील तीन कर्मयोगी आज शासकीय सेवेतून निवृत्त


अकोला : अकोला जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती बाळापूरचे सहाय्यक गट विकास अधिकारी पजई, पंचायत समिती बार्शीटाकळीचे गट विकास अधिकारी पवार तसेच पंचायत समिती पातूरचे विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे हे आज आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
शासकीय सेवेत कार्यरत असताना ग्रामीण विकासाच्या विविध योजना, प्रशासन आणि नागरिकांशी संबंधित कामकाजात त्यांनी आपल्या अनुभवातून योगदान दिले. अनेक वर्षांच्या सेवेतून त्यांनी सहकारी अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांशी जपलेले संबंध आणि कार्याची सकारात्मक छाप ही त्यांच्या सेवाकाळाची महत्त्वपूर्ण ओळख ठरली आहे.
शासकीय सेवेला आज विराम मिळत असला, तरी त्यांनी केलेल्या कार्याच्या आठवणी कायम राहतील. त्यांच्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी, समाधान आणि आनंद लाभावा, तसेच सेवानिवृत्तीनंतरचे जीवन अधिक आनंददायी व निरोगी जावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
त्यांच्या प्रदीर्घ सेवेला मनःपूर्वक सलाम आणि पुढील आयुष्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *