Join WhatsApp group

महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना अकोला पदाधिकाऱ्यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

अकोला
१८ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने सादर केलेल्या उपोषण नोटीसवर विभाग नियंत्रक,अकोला यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली होती व चर्चेअंती उभयपक्षी मान्य केल्याप्रमाणे दिनांक:-२३ ऑगस्ट २०२५ पर्यंत अकोला विभागातील प्रथम टप्पा खातेमार्फत बढती परीक्षा पास वाहकांना वाहतूक नियंत्रकपदी पदोन्नतीचे आदेश देण्यात येईल व इतर पदोन्नतीची कारवाई टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.परंतु २३ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशासनाने संघटनेला दिलेला शब्द पाळलेला नाही.त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ने आज सोमवार दिनांक:-२५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी 11 वाजतापासुन विभागीय कार्यालय अकोला समोर आमरण उपोषण सुरु झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *