बांधकाम मजुर संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन
अकोला -बांधकाम मजुर संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करुन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या ३२ योजनांचा लाभनोंदीत सदस्यांना सुरळीत पणे देण्यात यावा. नोंदणीची व नुतनिकरणाची किचकट प्रक्रिया सुलभ करण्यात यावी या मागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले. इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला कायम स्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त देण्यात यावे….
