Join WhatsApp group

२७ व्या वर्षी अखंड सुरू असलेली पंढरपूर वारी; विठ्ठल भक्तांचा अविरत भक्तीप्रवास

choose 📰 प्रतिनिधी |विठ्ठल नामाचा अखंड गजर, भक्तीचा उत्साह आणि माउलीच्या दर्शनाची ओढ मनात घेऊन यावर्षी २७ व्या वर्षी पंढरपूर वारीसाठी वारकरी भक्तांचा उत्साही समूह रवाना झाला. सलग २७ वर्षांची ही अखंड परंपरा श्रद्धा, समर्पण आणि विठ्ठलभक्तीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.“ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “राम कृष्ण हरी” या नामघोषाने वातावरण भक्तिमय झाले. ह्यावारी…

Read Full News

विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाचा ब्रेक

२० एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयानुसारच शाळा सुरू करण्याचे निर्देश नागपूर, दि. १० जून : विदर्भातील शाळा सुरू करण्याच्या मुद्यावर आज मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. माननीय न्यायमूर्ती अनिल किल्लोर व माननीय न्यायमूर्ती राजेश वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत शिक्षण संचालनालयाने दि. ९ जून रोजी निर्गमित केलेले २२ जूनपासून शाळा सुरू…

Read Full News

खत टंचाईवर महाराष्ट्र शेतकरी संघटना आक्रमक; मुख्यमंत्र्यांना निवेदन

अकोला, दि. ३ जून २०२६ : महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने आज अकोला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे नेते सुगत भटकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.निवेदनात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील खत टंचाईचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये बफर झोनमध्ये अडकून पडलेला खतांचा साठा त्वरित शेतकऱ्यांसाठी…

Read Full News

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग प्राणायाम शिबिराचे आयोजन

अकोला : आस्था योग फाउंडेशन तथा महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विशेष योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 21 मे 2026 ते 21 जून 2026 या कालावधीत जानोरकर मंगल कार्यालय, अकोला येथे संपन्न होणार आहे. अमरावती विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष…

Read Full News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागात एका वर्षात ५ हजार प्रशिक्षित कार्यकर्ते नियुक्त करणार

— प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांची घोषणा; अमरावती व नागपूर विभागीय आढावा बैठक संपन्नअकोला : Sharad Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विदर्भातील अमरावती व नागपूर विभागाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडली.महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर विभागीय आढावा बैठका आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत…

Read Full News

महाराष्ट्रात योग आयोग स्थापनेची मागणीपालकमंत्र्यांना योग शिक्षक संघाचे निवेदन सादर

अकोला, दि. १ मे २०२६ (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्यात योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र योग आयोग स्थापन करण्यात यावा, या महत्त्वपूर्ण मागणीसाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघ, अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर यांना निवेदन सादर करण्यात आले.महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. याच प्रसंगी योग शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची…

Read Full News

आजपासून राज्यभर कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचा बेमुदत बंद – प्रशासनाविरोधात विक्रेत्यांचा थेट संघर्ष

अकोला (प्रतिनिधी):राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी अखेर संयम सोडत आजपासून (२७ एप्रिल २०२६) राज्यभर बेमुदत बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. कृषी विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे विक्रेत्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.अकोला जिल्हा कृषि व्यावसायिक संघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील विक्रेत्यांनी हा आंदोलनाचा इशारा यापूर्वीच दिला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न…

Read Full News

लहुजी शक्ती सेनेतर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

मुंबई-नागपूर पदयात्रेतील सहभागींचा सत्कार; अकोली जहागीर येथे भव्य रॅली अकोला (दि. ११ एप्रिल) : अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मुंबई ते नागपूर दरम्यान अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) मागणीसाठी आयोजित पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच भव्य…

Read Full News

शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले

अकोला/वाशीम : जिल्हा परिषद वाशीम येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. कालीदासजी तापी साहेब यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.कालीदासजी तापी साहेब हे शांत, संयमी व अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात अकोट पंचायत समिती, बार्शीटाकळी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सामान्य प्रशासन,…

Read Full News

गट-ब बदली प्रक्रिया : समुपदेशन पुढे ढकलले, प्रशासनाकडून लवकरच नवीन वेळापत्रक

अमरावती | प्रतिनिधीमहाराष्ट्र विकास सेवा गट-ब संवर्गातील सर्वसाधारण (प्रशासकीय) बदल्या २०२६ संदर्भातील समुपदेशन प्रक्रिया काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.यापूर्वी ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र,…

Read Full News