मराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्ष पदी गजानन हरणे मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या योद्ध्यावर संघटनेचा विश्वास
अकोला, अकोला जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक गजानन ओंकार हरणे यांची अ.भा. मराठा सेवा संघाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वामनराव भिलारे आणि राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर यांनी ही निवड जाहीर करत हरणे यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.या निवडीमुळे अकोला जिल्ह्यातील मराठा समाजात उत्साह…
