अकोला : प्रतिनिधी –
भारताची प्रतिष्ठेची असलेली यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन रँक 948 मिळवत अकोला जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पातूर येथील विद्यार्थीनी कु. रेणुका दिनेश केकन हिचा लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातून येत कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर रेणुका केकन हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लहुजी शक्ती सेना पश्चिम विदर्भाचे महासचिव विष्णुभाऊ शेलारकर यांच्या नेतृत्वात हा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमात राहुल घनगाव, राहुल तायडे, अजय अवचार, ऋतिक बोरकर, देवा वानखडे, सागर नाटेकर, गजानन गवई, अजय नाटकर, महादेव घोडे, हर्षल शेलारकर, श्री मानकर, अमोल गवई यांच्यासह लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी रेणुका केकन हिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत तिच्या पुढील प्रशासकीय सेवेतही उत्तुंग यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या
युपीएससीत यश; पातूरच्या रेणुका केकनचा लहुजी शक्ती सेनेकडून सत्कार
