डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत मंजूर विहिरींचे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
अकोला, दि. २६ फेब्रुवारी २०२६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये मंजूर झालेल्या विहिरींचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याने बार्शीटाकळी, अकोला, पातूर, बाळापूर आणि मुर्तीजापूर तालुक्यातील ४० ते ५० अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हे शेतकरी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर बसले असून, त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह (मुले आणि पत्नी)…
