Join WhatsApp group

अली फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर अली यांना डॉक्टरेट पदवीने सन्मान२५ एप्रिल २०२६ रोजी


अकोला : प्रतिनिधी –
अली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजहर अली यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटी यांच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान २५ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अजहर अली हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध उपक्रमांद्वारे समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या पुढाकारातून दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. तसेच युवकांमध्ये क्रीडा भावना वाढीस लागावी यासाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
शिक्षण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून अनेकांना लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. याशिवाय महिलांच्या स्वावलंबनासाठी शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले आहे.
कोरोना काळातील लॉकडाऊन दरम्यान अली फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून मोठे सहकार्य करण्यात आले होते.
त्यांच्या या विविध सामाजिक कार्याची दखल घेत यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या वतीने अजहर अली यांना अनेक पदांनी व पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता दिल्ली येथे मिळणाऱ्या मानद डॉक्टरेट सन्मानामुळे त्यांच्या कार्याला नवी ओळख मिळणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *