आजपासून राज्यभर कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचा बेमुदत बंद – प्रशासनाविरोधात विक्रेत्यांचा थेट संघर्ष
अकोला (प्रतिनिधी):राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी अखेर संयम सोडत आजपासून (२७ एप्रिल २०२६) राज्यभर बेमुदत बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. कृषी विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे विक्रेत्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे.अकोला जिल्हा कृषि व्यावसायिक संघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील विक्रेत्यांनी हा आंदोलनाचा इशारा यापूर्वीच दिला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न…
