गोठी उमरी येथे सम्यक सिद्धार्थ व्यायाम, क्रीडा, शिक्षण प्रसारक बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने बुद्ध पौर्णिमा, १ मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मंडळाचे रजिस्ट्रेशन क्रमांक एफ. १७५०७ असून या निमित्ताने भोजनदान तसेच भीमगीतांच्या कार्यक्रमाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाला उमरी परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

भगवान बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व सभासद, युवा कार्यकारिणीतील युवक तसेच महिलांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे अध्यक्ष शरद इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश धांडे यांनी व्यक्त केले.
