उमरी (दि. २९ मार्च २०२६, रविवार) : सम्यक सिद्धार्थ बहु. मंडळ, उमरी मोठी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेवकाचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.

सम्यक सिद्धार्थ बहु. मंडळाचे अध्यक्ष शरदभाऊ इंगोले
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री संदीप शेगोकार, सौ. शिल्याताई वरोकार तसेच व-सौ. पल्लवीताई गावडे व संदीपभारू गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नगरसेवकांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत, विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन सम्यक सिद्धार्थ बहु. मंडळाचे अध्यक्ष शरदभाऊ इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी सचिव गजानन वर, सुरेश धाडे, अनिल इंगोले, गौतम इंगोले, गजानन धाडे रवि थाडे, प्रमोद मोरे आणि विक्रम मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे स्वागत व सत्कार समारंभ यशस्वीरीत्या पार पाडला.

या प्रसंगी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात सामाजिक ऐक्य व विकासाच्या दृष्टीने एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
