अकोला :- स्थानिक टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळा उमरी मोठी येथे शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरला शाळेतील चिमुकल्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी स्कूल बॅग, वॉटर बॅग, मिठाई, चॉकलेट पुष्पगुच्छ भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता याच सोबत राष्ट्रीय शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपदा नावकर मॅडम तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिगंबर वनारे , उमेश मसने, मुख्याध्यापक नयना इनामदार , मुख्याध्यापक दत्तात्रय कोल्हे, योगेश यमतकर सर, रूपाताई ठाकरे मॅडम सुनील भातुलकर, तर उपस्थिती म्हणून सारिका काळे मॅडम, विजय मेश्राम, प्रतिमा वडगावकर ,किरण सावके, संतोष गावंडे, शरद इंगोले, अंबादास निकाळजे, शैलेश ओळंबे, रवींद्र वानखडे, नितीन वर्गे , गुड्डू अत्तर कार, बबलू इंगोले, महादेव पत्रकार इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी मुरूमकर तर आभार प्रदर्शन साधनाताई देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या विद्यार्थ्यांनी व शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय शाळेत माजी विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांचे आगळे वेगळे स्वागत…..
