अकोला : गाव-खेड्यात विविध उपक्रमांव्दारे चेतना निर्माण करणार्या युवा लोक चळवळीच उपक्रम जिल्हाच नव्हे तर राज्यासाठी पथदर्शक ‘ठरणारे आहेत. असे प्रतिपादन पातुरचे नायब तहसीलदार अजय तेलगोटे यांनी केले. यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासा’ठी गत महिन्यात राबविलेला वृक्षारोपण सप्ताह तसेच आदिवासीबहुल भागातील शिक्षणाचा स्तर उंचावण्यासा’ठी विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप हे दोन उपक्रम वाख्यानण्याजोगे आहेत. या उपक्रमांची शासन-प्रशासनस्तरावर दखल घेण्यात आली ही बाबच पथदर्शकतेची पावती म्हणावी लागेल, असेही ते म्हणाले.
पातुर तालुका युवा लोकचळ या अराजकीय विचारपी’ाच्यावतीने आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, ८ ऑगस्टरोजी पातूर तालुक्यातील पाचरण या आदिवासीबहूल खेड्यात शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी अजय तेलगोट बोलत होते.
युवा लोक चळवळचे संस्थापक अध्यक्ष अमोल घायवट यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला वामन जामकर, अशोक ‘ाकरे, वामन धंदरे, संतोष ससाने, पोलीस पाटील सुरेश ससाने, प्रा. बाळासाहेब डोंगरे, प्रमोद घायवट, अशोक ढोके, ज्ञानेश्वर खिल्लारे, अमोल तिवाले, श्रीपत गिरे, अमोल तेलगोटे, निर्मला ढोके, वाघोजी ससाने, आत्माराम देवकर, संजय भुरकाडे, गजानन ससाने, सागर करवते, सुरेंद्र अवचार, किशोर सुरवाडे, मृणाल इंगळे, लावण्य हतकर, मारोती सोनटक्के, पवन ढोणे, शिवम आखरे, महेश काळमेघे, ज्ञानेश्वर पारसकर, प्रज्वल साबळे, रुपेश नवघरे, अमोल घायवट, आदित्य घायवट, मंगेश घायवट, विजय पायघन, अविनाश पोहरे, उपस्थित होते
युवा लोक चळवळीचे उपक्रम राज्यासाठी ‘ठरतील पथदर्शक -नायब तहसीलदार तेलगोटे
