Join WhatsApp group

जिल्ह्यात हरघर तिरंगा आणि स्वच्छता स्वातंत्र्य सप्ताहाचा शुभारंभ 15 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील मोहीम


अकोला दिनांक 11 ऑगस्ट:
स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात 15 ऑगस्ट पर्यंत हर घर तिरंगा खारघर स्वच्छता स्वच्छ स्वातंत्र्याचा उत्सव स्वच्छतेच्या संघ या टॅग लाईन सह स्वच्छता आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे या मोहिमेचा शुभारंभ दिनांक 8 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता तेलंग, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग श्री मिलिंद जाधव, गटविकास अधिकारी अकोला प्रेमा पटोकार, गटविकास अधिकारी अकोट माया वानखडे, गटविकास अधिकारी बाळापुर बी.पी. पजई, गटविकास अधिकारी बार्शीटाकळी रविकांत पवार, गटविकास अधिकारी मूर्तीजापुर मिलिंद मोरे, पातुर गटविकास अधिकारी सुनीता इंगळे, तेल्हारा गटविकास अधिकारी अशोक बांगर, यांच्यासह सहाय्यक गट विकास अधिकारी हरिनारायण परिहार उपस्थित होते.
या सप्ताहामधील उपक्रम : १. सुजल स्वच्छ गाव प्रतिज्ञा

  1. सार्वजनिक स्वच्छता मोहीम 3. मालमत्तांची स्वच्छता जसे. टाक्या, पंपहाऊस, नळ जोडण्या इत्यादी
    4.जलसंवर्धन उपक्रम. 5. जनजागृती रॅली आणि इतर कार्यक्रम व दिनांक 15 ऑगस्ट रोजी सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण
    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी सर्व ग्रामस्थ संस्था व शाळांना या अभियानात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच गटविकास अधिकारी यांना हे अभियान यशस्वी करण्याचे निर्देश दिले.
    या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता तेलंग यांनी केले. शपथ राहुल गोडले यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना डोंगरे यांनी केले.
    या कार्यक्रमासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील राहुल गोडले, अर्चना डोंगरे, सागर टाकले, प्रवीण पाचपोर, ममता गनोदे , श्रीकांत जगताप यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *