अकोला -बांधकाम मजुर संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करुन इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या ३२ योजनांचा लाभनोंदीत सदस्यांना सुरळीत पणे देण्यात यावा. नोंदणीची व नुतनिकरणाची किचकट प्रक्रिया सुलभ करण्यात यावी या मागणीचे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले.
इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला कायम स्वरुपी सहाय्यक कामगार आयुक्त देण्यात यावे. ग्रामसेवकांनी शहानिशा करुन मजुरांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्यात यावे. मजुर हिताच्या योजना टप्या टप्याने बंद करण्यात येत आहेत. त्या तात्काळ सुरु करण्यात यावे. प्रलंबित प्रकरणे काळमर्यादेत निकाली काढण्यात यावे. नोंदीत लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तूंचा संच व सुरक्षा संच देण्यात यावे. उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा. शहरी विभागात मनपा किंवा मंडळ निर्धारित अधिका-यांनी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र शहानिषा करुन सुलभतेने तात्काळ देण्यात यावे. इत्यादी मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा संकल्प कृती समितीचे अध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, उपाध्यख बाबुलाल डोंगरे, सचिव संदीप खंडारे, प्रविण खंडारे, सुनिल वानखडे, प्रेम वानखडे, पंचशील जी. गजघाटे, अनुराधाताई ढिसाळे, अक्षय सुर्यवंशी, दिनेश डोंगरदिवे, नदिम शाह, कुंदन पवार, जाकिर शहा, सचिन पडोळे, मायाताई नेमाडे, उज्वलाताई तायडे, सिध्दार्थ पाटील, भास्कर सोनोने, शेख एजाज, संदेश गोपनारायण, केदार ठाकरे, संदीप नरवने, अनिल येलकर, अजय उपर्वट, गोपाल उपर्वट, सुनिल ताथोड, स्वप्निल
उपर्वट, सचिन तायडे, विजय ढोले, शेख इर्शाद, रामेश्वर नाटकर, शिलवंत वानखडे, प्रकाश तेलगोटे, एजाज खान, किरण कावडे, सुखदेव मावळे, राहुल सिरसाट, शेख इर्शाद, अजिंक्य सूर्यवंशी, विशाल घायवट, प्रविण उडतकर, सागर नितनवरे, भिमराव वानखडे या कृती बांधकाम मजुर संघटना कृती समितीच्या सदस्यांसह असंख्य मजुर धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
