Join WhatsApp group

शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले


अकोला/वाशीम : जिल्हा परिषद वाशीम येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. कालीदासजी तापी साहेब यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
कालीदासजी तापी साहेब हे शांत, संयमी व अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या सेवाकाळात अकोट पंचायत समिती, बार्शीटाकळी पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सामान्य प्रशासन, अकोला येथील विविध विभागांची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली होती. त्यांच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता यांचा सुंदर संगम दिसून येत होता.
त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ व सहकार्यशील असल्यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदरभाव होता. अनेकांसाठी ते मार्गदर्शक व प्रेरणास्थान होते.
त्यांच्या अकाली निधनामुळे प्रशासन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *