Join WhatsApp group

तिहेरी पदभार, तरीही प्रशासनात वेग आणि शिस्त


अकोला : अकोला जिल्हा परिषद येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्याकडे सध्या अति मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) अकोला या पदांचा तृतीय प्रभार असून, तिहेरी जबाबदारी सांभाळत त्यांनी प्रशासनात कार्यक्षमतेची नवी उंची गाठली आहे.


सामान्य प्रशासन विभागाच्या दैनंदिन कामकाजासोबतच विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विभागीय समन्वय आणि वेळेवर निर्णयप्रक्रिया या सर्व बाबींमध्ये लोखंडे यांनी उल्लेखनीय शिस्त व गतिमानता आणली आहे. तिहेरी पदभार असूनही कोणत्याही कामात विलंब न होता सर्व कामकाज सुरळीत सुरू असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत दिसून येत आहे.

Oplus_16908288


ग्रामीण विकास योजनांच्या अंमलबजावणीत विशेष लक्ष देत त्यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य दिले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखून पारदर्शक व जबाबदार प्रशासनाची पायाभरणी त्यांनी केली आहे. बैठका, आढावा बैठकांचे नियोजन, तसेच योजनांच्या प्रगतीचा सातत्याने पाठपुरावा यामुळे विकासकामांना गती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, तात्पुरत्या स्वरूपातील अतिरिक्त जबाबदाऱ्या असूनही लोखंडे यांनी कोणतीही तडजोड न करता प्रशासनातील शिस्त, वेळेचे नियोजन आणि निर्णयक्षमता यांचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्हा परिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून कर्मचारी वर्गातही उत्साह संचारला आहे.
तिहेरी जबाबदारी यशस्वीपणे पेलत प्रशासन सुस्थितीत ठेवणारे दिगंबर लोखंडे हे सध्या जिल्हा परिषदेत कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक ठरत आहेत, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *