Join WhatsApp group

मंगळवारी महानगरात होणार पारंपरिक मूर्ख संमेलनमूर्खाधिराज’ विशाल प्रदीप शर्मा यांची निघणार विराट मिरवणूक

अकोला : होलिकोत्सवानिमित्त अकोला शहरात आयोजित पारंपरिक ‘मूर्ख सम्मेलन’ यंदा आपल्या 54 व्या वर्षात पदार्पण करत आहे. “मूर्खता अमर आहे” या संकल्पनेवर आधारित हा हास्य-व्यंग्य आणि सांस्कृतिक सोहळा मंगळवार, दि.3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. या आगळ्या-वेगळ्या परंपरेची स्थापना स्व रामकिशोर श्रीवास गुरुजी यांनी केली असून डॉ. प्रा. कोमल राजेंद्र श्रीवास यांच्या पुढाकारातून ही परंपरा आजही उत्साहाने पुढे जात आहे.धुलीवंदनाच्या दिनी सायंकाळी 4 वाजता ‘मूर्खाधिराज’ विशाल प्रदीप शर्मा यांची विराट मिरवणूक सिटी कोतवालीच्या मागील भागातून प्रारंभ होणार आहे. कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, महानगरपालिका, प्रमिलाताई ओक हॉल मार्गे ही मिरवणूक खुले नाट्यगृहात दाखल होईल. या ठिकाणी कार्यक्रम कलाकार नियामक व नियंत्रक सर्वेशचंद्र कटियार व असून कार्यक्रम संचालक व उद्घोषक प्राचार्य डॉ. रामप्रकाश वर्मा यांच्या नियंत्रणात पारंपरिक हास्य, व्यंग्य आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम असलेले हे ‘मूर्ख सम्मेलन’होऊन यात अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत.आहे.कार्यक्रम कलाकार नियामक व नियंत्रक म्हणून सर्वेशचंद्र कटियार कार्यरत असून कार्यक्रमाचे संचालन व उद्घोषणा प्राचार्य डॉ. रामप्रकाश वर्मा करणार आहेत.याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.या 54 व्या मूर्ख संमेलनाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *