Join WhatsApp group

अकोला : जागतिक महिला दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थिनी व कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार सोहळा


अकोला : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी रविदासिय महिला मंडळातर्फे प्रमिलाताई ओक हॉल येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात येणार आहे.
शैक्षणिक सत्र २०२४–२५ मध्ये दहावी व बारावी परीक्षेत ९५ ते १०० टक्के गुण मिळवून अव्वल ठरलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचाही यावेळी गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून हास्यसम्राट किशोरजी बळी यांचा भन्नाट विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या विनोदी सादरीकरणामुळे महिला मेळाव्यात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.
रविदासिय महिला मंडळाच्या वतीने सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कल्याणीताई पदमणे यांनी केले आहे. महिला सक्षमीकरण, शिक्षणातील प्रगती आणि समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *