अकोला (प्रतिनिधी) – सकल कुंभार उत्कर्ष संस्था अकोला द्वारा संचालित सर्व शाखीय कुंभार समाज उपवर युवक-युवती परिचय समिती, अकोला यांच्या वतीने आयोजित ‘रेशिमगाठी’ पुस्तिका प्रकाशन सोहळा व कुंभार समाजातील उपवर युवक-युवतींचा परिचय मेळावा दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात पार पडला.
कार्यक्रमाच्या उद्घाटकपदी संजयजी गाते (अध्यक्ष, सकल कुंभार समाज विकास परिषद, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधाकरराव शेडोंकार (अध्यक्ष, विदर्भ कुंभार समाज सुधार समिती, अमरावती) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. पुंडलिकराव वनकर होते.
यावेळी पंजाबरावजी काकडे, सुभाषजी तेटवार, चंदन प्रजापती, नानासाहेब सौदागर, सतीशराव गावंडे, श्री रामदास गाडेकर, रामभाऊ खानापुरे, विजयभाऊ पोहनकर, किशोर कापडे, ॲड. सुरेंद्र वाडकर, तुळशीदास तळोकार, गोविंदराव कळमकर, अरुणराव पोहनकर, अशोकराव मांगुळकर, रामकृष्ण सावीकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मेळाव्याचे सूत्रबद्ध नियोजन, बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांसाठी निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था, स्वतंत्र स्वागत व नोंदणी कक्ष, लज्जतदार भोजन व्यवस्था तसेच हजारोंच्या संख्येने उपस्थित समाजबांधव आणि उपवर युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग ही कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये ठरली.
प्रा. दिलीप अप्तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कार्यसमितीचे प्रमुख व सदस्य — संजय वाडकर (जिल्हाध्यक्ष), संतोष सरोदे, ॲड. अरुण सौदागर, रामचंद्र मेहरे, राजेंद्र चांदुरकर, महेश डवरे सर, प्रा. नंदकिशोर थुटे, रमेशराव वनकर, प्रा. शेषराव शिंदे, रोहित हिवरकर, प्रकाश चांदुरकर, मनोज लोंदे, अनिल चतुरकार, मुरलीधर कावोकार, रामदास सरोदे, ऋषभ कावोकार, गुरुदत्त आगरकर, तुषार कुंभार, नरेंद्र आंबुलकर, शुभम कावोकर तसेच सौ. जयश्री अप्तुरकर, सौ. सुनीता सरोदे, सौ. सीमा काळकर, सौ. अश्विनी सरोदे, सौ. वैशाली वाडकर, सौ. आशाताई मांगुळकर, कविता सरोदे, वैशाली वनकर, मंदाकिनी आगरकर यांनी अथक परिश्रम घेतले.
समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना एकत्र येऊन परस्पर परिचय करून देण्यासाठी व योग्य स्थळे जुळविण्यासाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरला. या उपक्रमामुळे कुंभार समाजात सामाजिक ऐक्य दृढ होण्यास मोठी मदत झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
कुंभार समाजातील युवक-युवतींचा भव्य परिचय मेळावा उत्साहात संपन्न
