Join WhatsApp group

अकोला जिल्यातील सेतू केंद्र चालकांवर अन्याय

अकोला :
अकोला जिल्यातील सेतू केंद्र चालकांवर अन्याय होत असल्याची बाब समोर आली आहे. आधार केंद्रामध्ये लादण्यात आलेल्या अटी शर्ती अकोल्यात कडक ठेवण्यात आल्या असून, शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यात मात्र त्या शिथिल आहेत. यामुळे अकोल्यातील अनेक सेतू केंद्र चालक अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रविण डिक्कर यांनी या अन्यायाबाबत मा. आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत आधार केंद्रासाठी लावलेल्या अटींबाबत गंभीर विसंगती निदर्शनास आल्या.

🔹 अकोला जिल्ह्यात –

  1. ऑपरेटरचे १ जानेवारी २०२३ पूर्वीचे प्रमाणपत्र अनिवार्य.
  2. सेतू संचालक स्वतः ऑपरेटर असणे बंधनकारक.

🔹 बुलढाणा जिल्ह्यात –

  1. कोणतेही प्रमाणपत्र अनिवार्य नाही.
  2. सेतू संचालक ऑपरेटर नसला तरी चालेल.

तसेच LMS सर्टिफिकेटसाठी किमान १ महिना कालावधी लागत असल्याने सद्य मुदतीत पात्र ठरणे कठीण आहे. या अन्यायकारक अटींमुळे अकोल्यातील जास्तीत जास्त सेतू केंद्र चालक अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

याबाबत प्रविण डिक्कर यांनी मा. आमदार रणधीरभाऊ सावरकर यांना अन्याय दूर करण्याची मागणी केली असून, शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ असल्याने सोमवारी DCM ला भेटून मुदतवाढ मिळवण्याची माहिती दिली आहे.

👉 अकोल्यातील सेतू केंद्र चालकांवरील अन्याय तातडीने दूर करून बुलढाणा पॅटर्ननुसार अटी शिथिल करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *