Join WhatsApp group

बार्शिटाकळी पं.स.मध्ये सादील खर्चात लाखोंचा अपहार

Oplus_16777216

पालकमंत्र्यांकडे तक्रार
अकोला : पंचायत समिती बाशिटाकळीमध्ये सादील हेडअंतर्गत साहित्य खरेदीत लाखोंचा अपहार झाला असून, या खरेदीतील अपहाराची चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्याकडे तक्रारीतून केली आहे. या प्रकाराने पंचायत समिती गोटात खळबळ उडाली असून, जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांचे हात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
३१ मार्चच्या सादिल खर्चातून बार्शिटाकळी पंचायत समितीमध्ये संगणक, प्रिंटर व वायफाय संच खरेदी करण्यात आले.तसेच कार्यालयीन रंगरंगोटीची कामे करण्यात आली. परंतु, साहित्य खर्च तसेच रंगरंगोटी कामाचे कुठलेही दरपत्रक न बोलावता संबंधित कंत्राटदार व काम करणर्‍यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली. खरेदी केलेल्या साहित्याची साठा पुस्तक नोंद वही ३२ मध्ये आतापर्यंतही नोंद घेण्यात आली नाही. तसेच काढलेल्या देयकाची कोणत्याही प्रकारची बील सादर केले नाही. ज्यांनी बील काढले त्यांच्याकडे नस्ती उपलब्ध आहे. विशेष म्हणजे संबंधित भंडारपाल तीन महिन्यापासून रजेवर आहे. भंडारपाल याला या बाबत कोणतीत माहिती नाही. संबंधित गटविकास अधिकारी व सहायक लेखा अधिकारी यांनी संगणमत करुन साहित्य तसेच रंगरंगोटीची देयके काढले, असे तक्रारीत म्हटले आहे.
असा प्रकार सातही पंचायत समित्यांमध्ये झाला असल्याचे नाकारता येत नाही. पं.स.च्या गटविकास अधिकारी, सहायक लेखा अधिकार्‍यांच्या मर्जीनुसार सादिल खर्च दाखविण्यात आला आहे. बार्शिटाकळी पंचायत समितीला सुमारे ५ लाख रुपये सादिल खर्च दिला असून, खर्चात मोठा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी विजय देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *