Join WhatsApp group

अकोला जिल्हा परिषदेचा पुढाकार डिजी सेवा सुविधेचे उद्घाटन

अकोला, दि. २९ सप्टेंबर : महाराष्ट्राचे मुख्‍यमंत्री यांच्या संकल्पनेतील १५० दिवसांच्‍या कृती आराखडयानुसार ई-गव्‍हर्नन्‍स सुधारणा कार्यक्रमातून “डिजी सेवा” या उपक्रमाचे आज रीतसर उद्घाटन पार पडले . ग्रामपातळीवरील नागरीकांना शासकीय सेवा सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने मिळू लागल्या आहेत. जिल्‍हा परिषदेसह सर्व पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. हा उपक्रम डिजिटल भारत मोहिमेला चालना देणारा ठरत आहे. आज या सेवेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या हस्ते पार पडले. या सेवांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सीईओ अनिता मेश्राम यांनी केले आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन श्री. दिगंबर लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत रविकांत पवार यांचे सह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
या उपक्रमातर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल सेवा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. याद्वारे जन्म व मृत्यू दाखले, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, शालेय दाखले, तसेच विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून दिले जात आहेत. नागरिकांचे घरबसल्या काम होत असल्याने वेळ व पैशाची बचत होत आहे. तसेच ग्रामीण भागातील डिजिटल साक्षरतेत वाढ व तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “डिजी सेवा हा उपक्रम म्हणजे ग्रामविकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. जिल्‍हा परिषदेतील सर्व प्रशासन, ग्रामसेवक व ऑपरेटर यांचा समन्वय यात फार महत्त्वाचा ठरत आहे.”

“डिजी सेवा” च्‍या माध्‍यमातून 7057036040 या मोबाईल क्रमांकावर प्रश्‍न विचारल्‍यानंतर एका क्लिकवर सर्व माहीती नागरिकांना मिळणार आहे. त्‍यानुसार विविध स्‍वरुपाचे प्रश्‍न विचारुन “डिजी सेवा” च्‍या माध्‍यमातून उत्‍तरे मिळणे सोपे झाले आहे.
अनिता मेश्राम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, दिगंबर लोखंडे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी सामान्‍य प्रशासन यांनी डिजी सेवेचे उदघाटना नंतर या”डिजी सेवा” चा लाभ घेण्‍याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *