अकोला : जिल्हा परिषद प्रशासनातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बाळापूरचे सहाय्यक गटविकास अधिकारी बंडू पजई यांच्यावर प्रशासनाने इतकी मेहरबानी दाखवली आहे की, जिल्ह्यात अनेक आदर्श व अनुभवी गटविकास अधिकारी कार्यरत असतानाही पजई यांच्याकडेच पातूरचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला.
या निर्णयावरून जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली आहे. “ज्यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी असताना पजई यांच्याकडेच हा प्रभार का?” असा सवाल कर्मचारी वर्तुळात केला जात आहे.
दरम्यान, या प्रभारामागे वरिष्ठांशी जवळीक, हात ओले करण्याची देवाणघेवाण आणि राजकीय शिफारसी असल्याची कुजबुज सुरू आहे. चिरीमिरी देऊन प्रभार मिळविण्याच्या चर्चेला उधाण आले असून, प्रशासनाच्या या भूमिकेवर संशयाची सावली आहे.
🔴 प्रश्न उभे करणारे मुद्दे
आदर्श गटविकास अधिकारी डावलून पजई यांच्यावरच का मेहरबानी?
प्रभार देण्यामागे कोणत्या वरिष्ठांची भूमिका?
पारदर्शकतेच्या गाजावाजात “चिरीमिरी संस्कृती”ला खतपाणी?जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी वर्तुळात या निर्णयावरून प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पाणी कुठे मुरलं?” हा सवाल आता थेट जनतेत पोहचू लागला आहे.या वादग्रस्त प्रभाराने् पुन्हा एकदा प्रशासनातील ‘मेहरबानी राजकारण व पैशांची ताकद’ उघड केली आहे.