Join WhatsApp group

MIDC व्यापारी सुफीयान खान हत्या प्रकरण – फक्त १२ तासांत आरोपी ताब्यात

अकोला : शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडवणाऱ्या MIDC व्यापारी सुफीयान खान हत्या प्रकरणाचा गुन्हा फक्त १२ तासांत उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलिसांनी सर्व आरोपींना मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. या जलद आणि धाडसी कारवाईमुळे अकोला पोलिसांची पुन्हा एकदा गुन्हे उकल करण्यातील चातुर्य व तत्परता अधोरेखित झाली आहे.


घटना कशी घडली?
दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सुमारास व्यापारी सुफीयान खान आपल्या साथीदार साजीद खान, मोहम्मद कैफ बक्शउल्ला खान यांच्यासह रेल्वे लाईन बोगदा, मलकापूरजवळ कारने गेले होते.
तेथे सिगारेट पित असताना मोटारसायकलवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी “इकडे मुलगी आणली आहे का?” असा संशय व्यक्त करत वाद घालून हल्ला चढवला.
सदर चारही इसमांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. एवढ्यावर न थांबता त्यांनी चाकू काढून थेट सुफीयानवर धाव घेतली. साथीदारांनी मदतीसाठी कारखान्यात धाव घेतली असताना, आरोपींपैकी एकाने दुसऱ्याला आदेश दिला – “याला चाकूने मार” आणि क्षणातच सुफीयानच्या पोटावर व पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.
दरम्यान, साजीद खानलाही गंभीर इजा झाली तर फिर्यादी शेहरे आलमला बुक्यांनी मारहाण करण्यात आली.

रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
जखमी अवस्थेत सुफीयानला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
तर साथीदार साजीद खान सध्या गंभीर जखमी असून उपचार घेत आहे.


FIR व गुन्हा दाखल
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन खदान येथे अप क्रमांक ७०२/२५ भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११८(१), ११५(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाने संपूर्ण अकोला हादरून गेला होता.


पोलिसांची विजेच्या वेगाने कारवाई
घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी तात्काळ आदेश देऊन स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले.
निर्जन जंगल परिसरात, सीसीटीव्ही वा तांत्रिक पुरावे नसताना, केवळ बातमीदारांचे सहकार्य व तांत्रिक विश्लेषण यावर अवलंबून पोलिसांनी आरोपींना गाठले.


पहिला मोठा टप्पा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने अकोल्यातील विविध ठिकाणी छापे घालून आरोपी –
१) फैजान खान मुर्शरफ खान (रा. हाजी नगर, शिवणी) २) अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल (रा. ताज चौक, अकोट फाईल) ३) शोएब अली उर्फ राजा तैयब अली (रा. सैय्यद पुरा, शिवणी) यांना वाशीम बायपासवरून ताब्यात घेतले.

दुसरा मोठा टप्पा
यानंतर एक पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना झाले. तिथे शेगाव परिसरातून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी –
१) शेख अस्लम शेख अकबर (रा. अकोट फाईल)
२) सैय्यद शहबाज उर्फ सोनु सैय्यद मुजीब (रा. रामदास मठ, अकोला) ३) विधी संगर्षगस्त बालक यांना मोटारसायकलसह पकडण्यात आले.

सर्व आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हत्येचे कारण काय?
फिर्यादीच्या जबाबानुसार, सुफीयान व त्याचे साथीदार हे फक्त सिगारेटसाठी गेले होते.

मात्र आरोपींना त्यांच्यासोबत मुलगी असल्याचा संशय आल्याने वाद वाढला आणि तो थेट जीवघेण्या हल्ल्यात परिवर्तित झाला.

पोलिसांची टीम

या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासोबत सहा. पो.नि. विजय चव्हाण, स.पो.नि. गोपाल ढोले, पो.उ.नि. विष्णु बोडखे, माजीद पठान खान, पो.हवा. फिरोज खान, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, सुलतान पठाण, किशोर सोनाने, रवींद्र खंडारे, खुशाल नेमाडे, उमेश पराये, एजाज अहमद, भास्कर धोत्रे, कॉ. अभिषेक पाठक, आकाश मानकर, राज चंदेल, मो. आमीर, सतीश पवार, श्रीकांत पातोंड, अशोक सोनवणे, स्वप्नील खेडकर, अन्सार अहमद, राहुल गायकवाड तसेच चालक पो. हवा. प्रशांत कमलाकर, देवानंद खरात आदींचा सक्रिय सहभाग होता.

जिल्हा पोलिसांचे कौतुक
या धाडसी व जलद कारवाईमुळे जिल्हाभरातून पोलिसांचे कौतुक होत आहे. फक्त १२ तासांत संपूर्ण आरोपींचा शोध घेऊन हत्या प्रकरण उकलल्याने अकोला पोलिसांनी पुन्हा एकदा लोकांचा विश्वास जिंकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *