अकोला : जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागात गेल्या अनेक वर्षापासून कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे. कामाची निकड अशी प्रतिनियुक्यामध्ये प्रशासनकडून सबब पुढे करीत असले तरी ही सबब केवळ बचावासाठी केली जात असल्याचे आरोप होत आहेत. विभाग प्रमुखांच्या मर्जीतील प्रतिनियुक्त कर्मचारी रिकामे फिरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचार्यांकडून विभाग प्रमुखांना खाऊ मिळत असल्याचे अन्य कर्मचारी उघडपणे बोलत आहेत. विभाग प्रमुख त्यांना का रिलीव्ह करत नाहीत? त्यांच्यावरच मेहरबानी का? असे प्रश्न उभे करीत आहेत शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेअंतर्गत प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्यांच्या अपवादात्मक परिस्थितीत प्रशासकीय दृष्टीने प्रतिनियुक् त्या करावयाच्या असतील तर त्या मुख्य कार्यकारी यांनी विभागीय आयुक् तांच्या पूर्व परवानगीनेच कराव्यात. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. व आयुक् तांनी मान्यता दिलेल्या प्रतिनियुक् त्यांबाबतचा तिमाही अहवाल विभागीय आयुक् तांमार्फत शासनाकडे पाठवावा, असे शासनाच्या आदेशात ठळकपणे नमूद आहे. मात्र, जिल्हा परिषदमध्ये शासन निर्णयाची सर्रास पायमल्ली होत असून, अनेक कर्मचारी गेली ५ ते ६ वर्षापासून प्रतिनियुक्तीवरच आहेत. त्यांचे काम संपलेच नाही. त्यांची निकड कायमच आहे. परंतु, ही बाब कुणार्या पचनी न पडणारी असून, प्रशासन जाणीवपूर्वक प्रतिनियुक्त्या रद्द करीत नाही, असे आरोप होत आहेत. दरम्यान, या प्रतिनियुक्तयांबाबत दोन महिन्यापूर्वी तक्रारदेखील करण्यात आली आहे. परंतु, तक्रारीला केराची टोपली दाखवली गेली. त्यामुळे प्रतिनियुक्ती प्रकरणे थंड बस्त्यात बांधले असल्याचे दिसून येते. ////// माहितीही लपवली? प्रतिनियुक्त्यांबाबत झालेल्या तक्रारीवर वरिष्ठांनी माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे सांगितले होते. परंतु, माहिती मिळाल्यानंतरही एकाही कर्मचार्यांची प्रतिनियुक्ती रद्द झाली नाही. त्यामुळे प्रशासनाकडूनच माहिती लपविली जात आहे, असे अन्य कर्मचारी बोलत आहेत.