Join WhatsApp group

रेशन च्या लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी होणार वाटप

Oplus_16777216

अकोला-पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता तीन महिन्याचे धान्य रेशनच्या लाभार्थ्यांना देण्यात आले.दरम्यान आता सप्टेंबर पासून चे परिमाण जिल्हा पुरवठा विभागाने जाहीर केले असून त्यामध्ये गव्हाऐवजी ज्वारीचे वितरण प्राधान्य व अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना केले जाणार आहे.त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात गोरगरिबांच्या ताटात पोळी ऐवजी भाकर येणार आहे.

जिल्ह्यात आधारभूत किंमत योजनेद्वारे तेरा तालुक्यांतील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून ज्वारीची खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लाख २१ हजार ३८३ क्विंटल रब्बी ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे व ही ज्वारी आता सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे अंत्योदय व प्राधान्य गटातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.तसे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाद्वारा देण्यात आलेले आहे.त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून गव्हाचा कोटा कमी करून त्याऐवजी ज्वारीचे वाटप करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *