अकोला -सर्व जात धर्म समावेशक असलेला देश व राज्य यांचा विकासात करता आपले घरदार शेत जमीन त्याग करून स्वतः निराशा जनक जीवन जगत असलेला पहीला प्रकल्पग्रस्तांचा राज्यव्यापी दसरा मेळावा हा अकोला येथे होणार असल्याची घोषणा सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी काल एका मुलाखतीमध्ये सांगितले.
राज्यात प्रत्येक समाजाचे विविध ठिकाणी उत्साहाने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे सर्व समाज हा त्या मेळाव्यात जाऊन दिशा घेतात व एकमेकांच्या भेटी घाटी होता त्यामुळे या दसरा मेळाव्याला फार मोठा आधार असून अत्यंत उत्साह पूर्व हा मेळावा होत असतो
त्याच अनुषंगाने राज्यात अंदाजे 25 ते 30 लाख प्रकल्पग्रस्त कुटुंब असून त्यांना सुद्धा एकत्रित करण्याचा संघटनेचे उद्दिष्ट असून दसरा मेळाव्याचे हे पहिलं वर्ष असल्याने याला फार उत्साहाने व प्रेरणेने या मेळावाकडे सर्व राज्यातील प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागलेले आहेत या दसरा मेळाव्यात प्रकल्पग्रस्तांचे विविध संघटना विविध पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपले उपस्थिती दर्शवावी अशा आव्हान संजय धनाडे यांनी केलेले आहे
या प्रकल्पग्रस्त दसरा मेळाव्या विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येत असून त्यामध्ये अनेक बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे विशेषता प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना शासकीय सेवेत किंवा व्यवसाय करण्याकरिता कशी मदत करता येईल याकरिता विशेष भर देण्यात येणार आहे असे संजय धनाडे यांनी काल झालेल्या मुलाखतीत सांगितलेले आहे
प्रकल्पग्रस्तांचा दसरा मेळावा.- संजय धनाडे..
