Join WhatsApp group

ग्रामीण भागाच्या विकासाकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान: खा.अनुप धोत्रे

अकोला, दि ४ : ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास देशाच्या प्रगतीचा कणा असून ग्रामीण जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ एक प्रभावी व दूरदर्शी माध्यम ठरेल . या अभियानामध्ये अकोला जिल्ह्याने भरीव कामगिरी करुन जिल्ह्याचा नाव लौकीक करावा, असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज…

Read Full News

मराठा सेवा संघाच्या कार्यामुळे धार्मिक दंगली चे प्रमाण कमी झाले . अरविंद गावंडे

अकोला -:मराठा सेवा संघाच्या शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या प्रबोधनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम हिंदू बौद्ध अशा धार्मिक दंगलींचे प्रमाण कमी झाल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे यांनी केले. मराठा सेवा संघाच्या 36 व्या स्थापना दिनानिमित्त 31ऑक्टोबर रोजी मराठा सेवा संघ अकोला जिल्हा शाखेच्या वतीने स्थानिक मराठा मंडळ सभागृहात आयोजित मराठा स्नेह…

Read Full News

राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त विविध कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात समारोप

110 प्राध्यापक,क्रीडा प्रशिक्षक,क्रीडा शिक्षक, महिला क्रीडा शिक्षक,क्रीडा संघटक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार. अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या द्वारा स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 29 ऑगस्ट 2025रोजी सकाळी मा. खासदार…

Read Full News

MIDC व्यापारी सुफीयान खान हत्या प्रकरण – फक्त १२ तासांत आरोपी ताब्यात

अकोला : शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ उडवणाऱ्या MIDC व्यापारी सुफीयान खान हत्या प्रकरणाचा गुन्हा फक्त १२ तासांत उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलिसांनी सर्व आरोपींना मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे. या जलद आणि धाडसी कारवाईमुळे अकोला पोलिसांची पुन्हा एकदा गुन्हे उकल करण्यातील चातुर्य व तत्परता अधोरेखित झाली आहे. घटना कशी घडली?दि. ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी…

Read Full News

कापशी तलाव येथील स्वयंभू गणेश मंदिरात गणेशोत्सव उत्साहात – नवसाला पावणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अकोला तालुक्यातीलकापशी : कापशी तलावाच्या पायथ्याशी वसलेले स्वयंभू गणेश मंदिर हे केवळ गावाच्याच नव्हे तर संपूर्ण परिसरातील श्रद्धाळूंचे एक प्रमुख तीर्थस्थान बनले आहे. या ठिकाणी असलेली गणेशाची मूर्ती ही स्वतः प्रगट झालेली असल्यामुळे गावकऱ्यांनी याला “स्वयंभू गणेश” असे नाव दिले. कालांतराने या ठिकाणाला एक विशेष नावलौकिक प्राप्त झाला आहे. स्वयंभू गणेश हे “नवसाला पावणारे गणपती”…

Read Full News

आदर्श महाविद्यालयाच्या अनुष्का देशमुखचे दुहेरी यश – इस्रो भेटीची संधी मिळवली

अकोला : दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रीय अंतरिक्ष दिनानिमित्त जिल्हा परिषद (माध्यमिक) शिक्षणाधिकारी यांच्या पुढाकाराने तसेच विज्ञान अध्यापक मंडळ व कुतूहल संस्कार केंद्र, अकोला यांच्या सहकार्याने हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी आणि अंतरिक्ष संशोधनाची प्रेरणा मिळावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी…

Read Full News

राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी काशिनाथ बागडे यांची नियुक्ती

अकोला – स्थानिक खदान सिंधी कॅम्प येथे राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात काशिनाथ बागडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली व त्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दीपमाला आर. कांबळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मुन्ना पांडे, राष्ट्रीय सचिव संजना कांबळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या…

Read Full News

शरदचंद्र पवार साहेब आणि आंबेडकरी नेत्याचं राजकीय धोरण ! पुस्तकाचे थाटात प्रकाशन

अकोला – शरदचंद्र पवार साहेब आणि आंबेडकरी नेत्याचं राजकीय धोरण ! या रामकृष्ण गोपनारायण द्वारा लिखीत पुस्तकाचे दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता स्थानिक विश्रामगृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्यामबाबू अवस्थी, प्रमुख उपस्थितीमध्ये महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मो….

Read Full News

जनजागृती असंघटीत बांधकाम मजुर संघटनेच्या पाठपुराव्याला यश- आता पूर्वीप्रमाणेच बांधकाम मजुरांना ९० दिवसांचे बांधकाम प्रमाणपत्र मिळणार

अकोला – बांधकाम मजुरांना ९० दिवसांचे बांधकाम प्रमाणपत्र द्या अशी मागणी जनजागृती असंघटीत बांधकाम मजुर संघटनेच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती, त्या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी यामध्ये दिशानिर्देश देत अकोला महानगरपालिकेच्या उपायुक्त (प्रशासन) गिता ठाकरे यांनी अमनपा/साप्रवि/आस्था/685/2025 दि. 25 ऑगस्ट 2025 रोजी पत्रान्वये चारही झोनला आदेशित करुन पुन्हा बांधकाम प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत….

Read Full News

अकोट तालुक्यातील अंबोडा ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन न झाल्याने वादंग

अकोट (जि. अकोला) : शासन निर्णयानुसार १५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामसभेचे आयोजन करणे अनिवार्य असूनही अकोट तालुक्यातील अंबोडा ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रविण श्रीकृष्ण बायवार या ग्रामपंचायत सदस्यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलमानुसार ग्रामसभेचे आयोजन करणे बंधनकारक आहे….

Read Full News