अकोला -:मराठा सेवा संघाच्या शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या प्रबोधनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम हिंदू बौद्ध अशा धार्मिक दंगलींचे प्रमाण कमी झाल्याचे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरविंद गावंडे यांनी केले. मराठा सेवा संघाच्या 36 व्या स्थापना दिनानिमित्त 31ऑक्टोबर रोजी मराठा सेवा संघ अकोला जिल्हा शाखेच्या वतीने स्थानिक मराठा मंडळ सभागृहात आयोजित मराठा स्नेह मिलन सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रणजीत कोरडे होते. यावेळी जिल्ह्यातील मान्यवरांचा कार्यगौरव करण्यात आला.

मराठा हा जातीवाचक शब्द नसुन समुहवाचक आहे. मराठा सेवा संघ जातीयवादी नसुन अठरा पगड जातीना सोबत घेऊन चालणारी प्रबोधनात्मक वैचारिक चळवळ आहे असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंचावर अरविंद गावंडे यांच्यासह मराठा सेवा संघाचे प्रदेश कोषाध्यक्ष अशोक पटोकार, विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले, सहाय्यक धर्मदाय आयुक्त महेश पाटील, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य (पोलीस अधीक्षक) निलेश पांडे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, डॉ. सुरेंद्र काळबांडे,
महाबीजचे प्रफुल्ल लहाने, प्रभात शिक्षण संस्थेचे डॉ.गजानन नारे, मंत्रालयातील वित्त अधिकारी विजय देशमुख, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा इंदूताई देशमुख, जिल्हाध्यक्षा रेणूताई गावंडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नमन आंबेकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, छ.शिवराय व छ.शंभूराजे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रमिलाताई भिसे यांनी जिजाऊ वंदना सादर केली तर कल्याणी सावके, अजय पाटील, सोयरा अंधारे, साक्षी बुले व श्रेया ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर हिंगणे यांनी केले. याप्रसंगी अर्चना अविनाश पाटील यांच्या अप्रतिम जोडी.कॉम मॅरेज ब्युरो च्या मोबाईल ऍपचे लॉंचिंग मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्मृतीचिन्ह व ग्रंथभेट देऊन कार्यगौरव करण्यात आला. कृषी उपसंचालक हरीष देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पो.नि. शंकर शेळके, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वाचक पो.नि.संगीताताई कदम, जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्रीताई कौलखेडे-सोनखासकर, वृक्षमित्र वासुदेवराव कडू, ग्रंथमित्र प्रा.राजेश ताले पाटील, सनदी लेखापाल मिथुन टेकाडे, डॉ.विनित हिंगणकर, विवेक ठाकरे, प्रगतीशील शेतकरी उद्योजिका सुवर्णाताई अरविंद गावंडे, पं.दे.कृ.विद्यापीठचे डॉ.ययाती तायडे, बांधकाम व्यावसायीक मुकेश माळी व अमोल पाटील रुजके, डॉ.हर्षवर्धन मालोकार, प्राचार्य बाळासाहेब थोरात, प्राचार्य रामेश्वर भिसे, ऍड.संतोष भोरे या मान्यवरांचा यावेळी कार्यगौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन अंजलीताई ठाकरे व प्रशांत बुले यांनी केले तर संजय इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.पुरुषोत्तम तायडे, विजयराव देशमुख, दिवाकरराव पाटील, विठ्ठलराव गाढे पाटील, संदीप निर्मळ, अरुण गावंडे, अविनाश पाटील, डॉ.सीमाताई तायडे, श्रीकांत बिहाडे, अतुल अंधारे, सुनिल जानोरकर, प्रा.प्रदीप चोरे, आनंद पाटील सुकळीकर, डॉ.निलेश मोहोड, देवराव पाटील हागे, प्रा.प्रशांत जानोळकर, प्रा. दिलिप आंबेकर, आर.आर.पाटील, श्रीकांत खाडे, राजेश खुमकर, श्रीकृष्ण जानोरकर, अवि गावंडे, अमोल पटोकार, जयदीप सोनखासकर, पंकज जायले, अनिल विखे, सविताताई कुटे, विष्णू गावंडे, ऍड.राहुल कुकडे, श्रीकृष्ण माळी, भागवत टेकाडे, अजिंक्य खाडे, संजय मालोकार, दिलीप देशमुख, विनोद साबळे यांनी प्रयत्न केले.


