अकोला:-ज्योतिर्लिंग मंदिर येथे महाशिवरात्री उत्सवा निमित्त दोन दिवसीय संगीत संध्या नुकतीच संपन्न झाली. शुक्रवार व शनिवार या 2 दिवसीय संगीत संध्या मध्ये स्वरंजलि संगीत विद्यालय जुने शहर शाखा विभाग च्या संचालिका प्रा वर्षा देशमुख व विद्यार्थी कलावंत यांनी सुरेल भक्ती रंग हा कार्यक्रम संपन्न केला तर शनिवार महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला देवेंद्र देशमुख व मुख्य शाखा संताजी नगर येथील विद्यार्थी कलावंतांनी बाहारदार हिंदी व मराठी भक्ती गीत कार्यक्रम संपन्न करून अनेक सुरेल भक्ती सुमने सादर केली.
बारा ज्योतिर्लिंग मंदिर विश्वस्त यांनी सर्व कलावंताचे कौतुक करून स्वागत केले.
या कार्यक्रमाला साथ संगत प्रा. अजय लोणकर हार्मोनियम तर मृदुंग ज्ञानेश्वरी यादगिरी तबला प्रशांत इगले व लोकेश अवचार साईड रिदम ह भ प अशोक टावरी या कलावंताची साथसंगत लाभली होती प्रा. देवेंद्र देशमुख प्रा वर्षा देशमुख यांनी सुरेल भक्ती सुमने सादर करून उपस्थितांची मने जिंकली..या कार्यक्रमात अँड निलू चराटे, कु. कस्तुरी कुलकर्णी, श्रुतिका देशमुख, वैभवी गवई, वंदना भोजने, श्रुतिका वानरे, तृप्ती शर्मा
,कू निधी वानखडे , अनवेशा शेरेकर,आरोही लांजूडकर , आरव डोंगरे, प्रदनेश सुडे,स्वरा नागलकर, तन्वी खर्चे, भक्ति नालट, गार्गी हीवरकर, ज्ञानदा देशमुख,सो.ज्योस्ना कोरडे राजेश्वरी सोनटक्के, प्रियंका. आमले, सुखदा ठाकरे इत्यादी स्वरांजली संगीत महाविद्यालय संताजी नगर अकोला च्या कलावंतांनी विविध भक्तीसुमने सादर केली. कार्यक्रमाला भरगच रसिकांची उपस्थिती लाभली होती.या संपूर्ण कार्यक्रमाला प्रा. शारदा देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले होते.
बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथे स्वरांजली कलावंतांचा भक्ती सुमने कार्यक्रम संपन्न.
