Join WhatsApp group

लाल ‘ फिती वर ‘ काळी ‘ फित उपाय..!

‘


महिला व बाल विकास विभागाकडील राजपत्रित अधिकारी संघटना व त्या विभागातील इतर अधिकारी कर्मचारी यांच्या सहयोगी संघटना यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत आंदोलनाचा इशारा यापूर्वीच देण्यात आलेला आहे. त्याचा भाग म्हणून आज जिल्हाभरातील सुमारे ……… अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून कामकाजावर येऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी (विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी वर्षा मीना , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्याकडे विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर करून आपल्या मागण्या सविस्तर मांडल्या.
काळयाफिती लावून आंदोलन करत असताना संवेदनशील अधिकारी व कर्मचारी यांनी महिला व बालके यांच्या सेवांमध्ये खंड पडणार नाही याची दक्षता घेतली आहे. संविधानिक पद्धतीने आपल्या मागण्या शासनाकडे मांडण्याची ही एक अनोखी पद्धत असून इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होणे ही कदाचित दुर्मिळ घटना असू शकते. ………….. जिल्ह्याप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यात अशा पद्धतीने निवेदन देणे व काळी फित लावून कामकाज करणे अशा स्वरूपाचे अभिनव कार्यक्रम राबवण्यात आला. पुढे पुढे आंदोलनात वेगवेगळ्या कृतींचा समावेश असून शासनाने तातडीने दखल घेणे अभिप्रेत असल्याचे कर्मचारी व अधिकारी यांचे म्हणणे आहे.
मा.जिल्हाधिकारी, मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत असताना राजपत्रित अधिकारी संघटनेचे सर्व अधिकारी, परिविक्षा अधिकारी संघटना, पर्यवेक्षिका संघटना, मुख्य सेविका संघटना, संरक्षण अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी संघटना, इतर कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना अशा सरसकट संवर्गातील प्रतिनिधींचा समावेश होता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, मिशन शक्ती, सामर्थ्य, संबल, मिशन वात्सल्य अशा अत्यंत महत्त्वपूर्ण व महिला व बालकांशी संबंधित असलेल्या सेवांमध्ये उत्कृष्ट प्रकारची कामगिरी सातत्याने करणाऱ्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अडचणींची वेळेत दखल घेणे आवश्यक आहे. महिला बाल विकास विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या विचारात घेता अनेक मागण्या बऱ्याच मोठ्या कालावधीपासून प्रलंबित आहे याचा अर्थ ” लाल ” फितीवर ” काळया ” फितीचा उपाय कितपत उपयोगी पडतो हे येणारा काळ ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *