अकोला:-पुडुचेरी येथे दि. ३० जानेवारी २०२६ ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान १३व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम, पंजाब, छत्तीसगड, झारखंड व आंध्रप्रदेश या राज्यांतील सुमारे ५५० खेळाडू व २५० अधिकारी, पंच व रेफरींनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन मा. कॅप्टन प्रदीपन राजे (अध्यक्ष – इंडियन सिलंबम फेडरेशन) यांच्या हस्ते झाले. यावेळी अलेगिरी (महासचिव), विजयबाबू (टेक्निकल डायरेक्टर) उपस्थित होते.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करत पुढील पदके मिळविली –
हितेंद्रसिंग सारवान – सुविंग स्टिक प्रकारात रौप्य पदक,
हितेंद्रसिंग सारवान – स्टिक फेन्सिंग सिलंबम फाईट प्रकारात रौप्य पदक,
स्वराज पावसाळे – कांस्य पदक,
आराध्या चिंचोलकर – कांस्य पदक,
कृष्णाली अडाऊ – कांस्य पदक,
अंजली तायडे – कांस्य पदक,
तसेच रितिक अग्रवाल यांना मिळालेल्या कांस्य पदकाबद्दल पुडुचेरीचे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
महाराष्ट्र संघाने मा.अरुण सारवान (अध्यक्ष – महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन) यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला होता. संघाचे नेतृत्व डॉ. खुशबू चोपडे (कार्यकारी सचिव) यांनी केले.
खेळाडूंना यशाबद्दल मा. सुहासिनीताई धोत्रे (सामाजिक कार्यकर्त्या), मा. सतीशचंद्र भट (जिल्हा क्रीडा अधिकारी), मा. सैय्यद जावेद अली (जिल्हा क्रीडा परिषद सदस्य), मा. वासुदेव वाघ, मा. गणेश भिरड, मा. भुपेंद्रसिंग सारवान, अॅड. नितीन धुत, अॅड. अजय जाधव, अॅड. अभिषेक शर्मा, अॅड. संतोष गेळे तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
या यशाचे श्रेय खेळाडूंनी आपले प्रशिक्षक डॉ. खुशबू चोपडे यांना दिले आहे.
