अकोला – स्थानिक शासकीय विश्रामगृह अकोला येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. व बैठक सुरु असतांना या ठिकाणी अकोला जिल्हा सरपंच संघटनेचे शिष्टमंडळ हे अकोल्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून राजस्थान आणि छत्तीसगढच्या धर्तीवर मुदतवाढ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासन म्हणून सरपंचाची नियुक्ती करण्याची मागणी या शिष्टमंडळाद्वारे अकोल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
यामध्ये शिष्टमंडळाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना मुदतवाढ देण्यात येवून विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्ती देण्यात यावी अश्या स्वरुपाची मागणी शिष्टमंडळाने शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मा.आ. नारायणराव गव्हाणकर व प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, महिला जिल्हाप्रमुख व नगरसेविका उषाताई विरक, जिल्हाप्रमुख रेखाताई राऊत, उपजिल्हा प्रमुख ललीतजी वानखडे, शिवसेना महानगर प्रमुख राजेशजी मिश्रा यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाढवे, वृषाली क्षिरसागर, सुषमा ठाकरे, संतोष सुरळकर, पंकज वानखडे, अश्र्विनी काकड, मालती सिरसाट, सिमाताई पाथ्रीकर, अंतकला वानखडे, नितीन वाकोडे, राधा मोहोकार, सुनिल ठाकरे, शारदा जगताप, दिपाली सरदार, बंडू घाटे, पुरुषोत्तम लसनापूरे, विष्णु लव्हाळे, अर्चना शिंदे, विश्र्वकला आठवले, प्रिया तायडे, कल्पना पळसपगार, उमाताई माळी, सिमा खंडारे आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. सरपंच संघटना यांच्या विनंतीवरुन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांना निवेदन सादर करण्यात आले व यानंतर मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.
प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचाची नियुक्ती करासरपंच संघटनेची नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांद्वारे शिष्टमंडळाची मागणी
