Join WhatsApp group

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंतापदी अतुल साळुंके

अकोला-जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा प्रभार हिंगोली जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंके यांनी सोमवार, १५ रोजी स्वीकारला.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले होते.

जिल्हा परिषदेतील अनेक महत्त्वाच्या पदाचा कार्यभार हा प्रभारीच्या खांद्यावर आहे.दरम्यान ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा प्रभार हा उपअभियंता मिलिंद जाधव यांच्याकडे देण्यात आला होता.दरम्यान शासनाने अतुल साळुंके यांची नियुक्ती केली आहे.पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने जलजीवन मिशन सारख्या कामांना गती येणार आहे.सोमवारी त्यांनी पदभार स्वीकारताना जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *