शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील गंगुबाई शिंदे सभागृहात अकोला शहरातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या वेळी उबाठा तसेच विविध पक्षांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामध्ये भाजप चे माजी महानगरप्रमुख डॉ. अशोक ओळंबे पाटील, वबलू उके, राजेश डांगे, रमेश कानापुरे, सुधाकर चव्हाण, शुभम डांगे, प्रफुल्ल पोंडे, आनंद गुरखे, संतोष टप्पे, आशीष हटवुळे, संदेश वानखेडे, आकाश शिरसाठ , रोहन वानखेडे, सिद्धार्थ नागापुरे, अशोकराव डांगे पाटील, मनोज बाविस्कर, गणेश केंकरे, रोहित पुळकाळ, शिला गणेश काळे, जिजा संतोष विधाते, अर्चना शिवचंद्र हिरे, निता नंदकुमार काळे, संगीता रविकांत मेनुर, निर्मला संजय इंगळे, कृष्णा नारायण इंगळे, सुनीता नितीन बाजार, संतोष विधाते तसेच प्रकाश वानखडे, अंकुश शिंदे, अविनाश कोंकेरे, सतीश नागदेवे, संजय पुट्टेलू, सतीश बनारे, शशांक भोसले, गजानन पाल, मंगेश पावले, अर्जुन धीरसागर, योगेश गवळी, रोशन अहिर, नितीन देशमुख, आकाश बोडखे, सुमित सर्वबुद्धे, योगेश गायकवाड, वैभव खेडकर, श्याम मोहिते, अमोल यादव, गणेश खेडकर, दीपक रेंगे, कृष्णा जयस्वाल, अक्षय जंजाळ, संदीप सुतार, बजरंग यादव, करण तायडे, रोहित तुपनारायण, विवेकी बावरे, सागर वानखडे, सिद्धार्थ वानखडे, आकाश खंडारे, कुणाल लोंढे, संजय बुंदेले यांचाही प्रमुख सहभाग होता.
या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया, संपर्कप्रमुख डॉ. राजन साळवी, जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर,चंद्रशेखर पांडे गुरुजी, अश्विन नवले, महिला जिल्हा संघटिका उषाताई विरक, महानगरप्रमुख राजेश मिश्रा, राज्य सम्न्यवक ललित वानखडे नगरसेवक मंगेश काळे, मनोज पाटील, सागर भारूका, प्रणव तायडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
या पक्षप्रवेशामुळे अकोला शहरात शिवसेनेची ताकद आणखी बळकट झाली असून आगामी काळात संघटनवाढीस मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवासी जिल्हा प्रमुख संतोष अनासाने यांनी कळविले आहे
ठाण्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; अकोला शहरातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
