Join WhatsApp group

प्रकल्पग्रस्त समाजाने संघटित होऊन कार्य करा*… *संजय धनाडे*

राज्यात प्रकल्पग्रस्तांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत असून देशात महाराष्ट्र राज्य हे विकसित राज्य म्हणून प्रथम क्रमांकावर आहे.
25 ते 30 लाख पर्यंत प्रकल्पग्रस्तांची संख्या राज्यात झाली असून प्रत्येक विधानसभेत किमान पाच ते सहा हजारांपर्यंत संख्या प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या ही राज्यात चार लाखाच्या वर्त झाली आहे अजून पर्यंत प्रकल्पग्रस्त हे आपल्या समस्यांपासून वंचित आहेत याचे कारण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. हे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्त समाजाने संघटित होऊन कार्य करणे गरजेचे आहे असे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबे टाकळी येथील मन मस तोरणा, बेरोजगार प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची नेते संजयभाऊ धनाडे यांनी प्रकल्पग्रस्तांना प्रतिपादन केले.
याप्रसंगी त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या संदर्भात सविस्तर माहिती दिली असून पाच टक्के वर पंधरा टक्के सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार 50 टक्के आहे व एमपीएससी मध्ये वर्ग एक वर्ग दोन मध्ये सहभाग तसेच पुनर्वसन गावात प्रकल्पग्रस्त भवन, कंत्राटी प्रकल्पग्रस्तांना कायम करणे त्यांचे वयोमरगा संपुष्टात आले त्यांना एक रकमे रक्कम देऊन प्रमाणपत्र जमा करणे या व आधी आधी मागण्या संबंधात माहिती दिली. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस विजय चव्हाण यांनी कलम 28 अंतर्गत मिळणाऱ्या वाळीव मोबदल्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी संघटना स्थापनेपासूनचे 1998 पासून चे सर्व संघटनेची पदाधिकारी जुने कार्यकर्ते नवीन बेरोजगार प्रकल्पग्रस्त उपस्थिती होती.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष राठोड सरचिटणीस गजानन पातोडे, संजय राठोड टेलर, दिलीप पांढरे, पुरुषोत्तम भोलांकर, अशोक पांढरे, संतोष राठोड, भास्कर शेगोकार, गणेश शेगोकार, तुळशीदास राठोड, अनिकेत पांढरे, रामदास साळवे, रामभाऊ कोकरे, निखिल वानखडे, रुपेश वानखडे, संतोष वानखडे, धर्मेंद्र वानखडे, गणेश जाधव, शांताराम शंकर, राजू राठोड, संदीप राठोड, जयसिंग पवार, रवींद्र राठोड, आकाश पाटोळे, अँड आकाश पातोडे संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख संदीप राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *