Join WhatsApp group

पोकरा योजनेतून कोठारी येथे महिलांची शेतिशाळा संपन्न

कोठारी, ता. अकोला (प्रतिनिधी) — पोकरा योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी आयोजित तुर पिकाची शेतिशाळा दिनांक ९ ऑक्टोबर रोजी कोठारी येथे उत्साहात पार पडली

. या शेतिशाळेत महिलांना आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, पिक संरक्षण तसेच उत्पन्न वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन देण्यात आले. उपकृषि अधिकारी मनीषा जोशी आणि
सहाय्यक कृषि अधिकारी नीलेश करस्कार यांनी पोकरा योजनेचे उद्दिष्ट आणि त्याचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच महिलांनी समूहशेती, पाणी संवर्धन व खर्च बचतीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


या कार्यक्रमात एकूण ३० महिला शेतकरी सहभागी झाल्या होत्या. शेतिशाळेच्या माध्यमातून महिलांना शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाचे आयोजन कृषि विभाग, अकोला यांच्या वतीने न्यानु पाटिल साबळे यांच्या शेतात करण्यात आले होते. महिलांचा शेती क्षेत्रातील सहभाग वाढविणे व आर्थिक सशक्तीकरण साध्य करणे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे कु.जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा जोशी यानी तर कृषिताई कु.दीक्षा शिराळे यानी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कु.दीक्षा शिराळे यानी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *