Join WhatsApp group

संजय राऊत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून तीव्र निषेध – ‘जोडो मारो आंदोलन’ने अकोल्यात वातावरण तापले

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गलिच्छ, नालायक आणि अश्लील वक्तव्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या पार्श्वभूमीवर अकोला येथे बस स्टॅन्ड चौकात ‘जोडो मारो आंदोलन’ आयोजित करण्यात आले. हातात पोस्टर, बॅनर घेऊन आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांचा निषेध करत स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा राज्यकारभार, आर्थिक शिस्त आणि जनतेप्रती असलेली निष्ठा ही संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य हे पक्षद्वेषातून प्रेरित आणि अत्यंत खालच्या दर्जाचे आहे.”

तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल काळणे यांनी इशारा दिला की, “जर संजय राऊत यांनी आपले अपशब्द परत घेतले नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

यावेळी जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदुजमा यांनी आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले की,
“आमचा नेता, आमचा स्वाभिमान! अपशब्द बोलणाऱ्याची यापुढे खैर नाही.”

या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बदुजमा यांनी केले. त्यासोबत महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, जिल्हा महासचिव विकास पवार, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश खाडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विनोद कोगदे, कामगार कल्याण विभागाचे शुभम तिडके, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष उमेर अदनान, ज्येष्ठ नेते सदाशिव शेळके, विजय उजवणे, जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत शिरसाठ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष गणेश थोरात, शहर अध्यक्ष रिझवानबाबा, तालुका अध्यक्ष आशिष पवार, उपाध्यक्ष विक्की लहरीया, अकोला तालुकाध्यक्ष गणेश सांगळे, अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष चेतन फुकट, अकोट तालुकाध्यक्ष धिरज गिते, कार्याध्यक्ष निखिल रोडे, अकोट विधानसभा अध्यक्ष राम वरणकार यांसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.

याशिवाय अरुण चव्हाण, सुरेश बोचरे, सुषमा राठोड, रंजना शिरसाट, शीतल जंजाळ, निशा ठाकरे, शीतल शेंडे, उमाताई महल्ले, शीतल भुस्कडे, प्रियाताई सराग, संजय बढे, यश तायडे, दर्शन खेडकर, अनिल मालगे, प्रकाश तायडे, जयदेव इंगळे, राजेश काळे, ऋषिकेश माळी, श्रीकांत शिरसाट, संतोष वैदल, अजय नवकर, शेपू उल्लाखान पठाण, गौरव भगत, अमोल वानखडे, महेश बुटे, रोहित बुटे, अतुल मेतकर, मंगेश दाते, भूषण बुटे, विक्रम श्रीनाथ, अतुल वसतकार, मंगेश केवट, ईशान प्रधान, रोशन झटाले, प्रफुल पागृत, अजय रेलकर, कैलास गावंडे, गोलु भगत यांसह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

या आंदोलनाने बस स्टॅन्ड चौक दणाणून गेला. “अजितदादा आमचा अभिमान”, “संजय राऊत मुर्दाबाद”, “अपशब्द सहन करणार नाही” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचा तीव्र निषेध केला.

कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य मागे घेण्याची मागणी करत त्यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. आंदोलनादरम्यान प्रशासनाने खबरदारी घेत पोलिस बंदोबस्त ठेवला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या या आंदोलनाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून संजय राऊत यांच्यावरील दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांनी यावेळी एकजूट दाखवत “आमच्या नेत्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही” असा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रभर या आंदोलनाचा लवकरच विस्तार करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

या आंदोलनाने अकोला शहरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली असून कार्यकर्त्यांचा जोश आणि संताप स्पष्टपणे जाणवत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *