Join WhatsApp group

मनपा शाळा क्र. 14 येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान व गुणगौरव सत्कार

अकोला – मनपा शाळा क्र. 14 येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान व गुणगौरव सत्कार करण्यात आला.
5 सप्टेंबर जागतिक शिक्षक दिन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंतीचे निमित्त साधून महानगरपालिका शाळा क्रमांक 14 सिंधी कॅम्प अकोला येथे माजी मुख्याध्यापक तसेच कर्मचारी वृंद यांचा यथोचित्त सत्कार व सन्मान गुण गौरव करुन शिक्षकदिन मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचबरोबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचा तसेच कार्याचा गुणगौरव करण्यात आले. शिक्षण दिनाच्या कार्यक्रमात शाळेच्या प्रगती करीता व अमूल्य योगदान दिल्याबद्दल मनपा शाळा क्र. 14 चे माजी मुख्याध्यापक अरुणा राणे यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मनपा शाळा क्र. 14 चे मुख्याध्यापक सौ. सुकन्या साबळे, सौ कोकीळा भिसे मॅडम, श्री रविंद्र वानखडे सर यांचा समावेश होता तसेच शिक्षक वृंदांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यामध्ये गजानन काकड सर, मंगला इंगळे (वानखडे) मॅडम SMC अध्यक्ष विशाखा महातो यांचा समावेश होता, तसेच शाळेतील सर्वच कार्यरत शिक्षकांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. मनपा शिक्षण विभागातर्फे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मनीषा खंडारे (वानखडे) मॅडम यांचा शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते गुणगौरव सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शाळेतील सर्वच शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र वानखडे, अरुणा राणे मॅडम, कोकिळा भिसे मॅडम यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अमिता गवई( इंगळे) मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राठोड सर, चौधरी सर, मनीषा वानखडे, अमिता इंगळे, पुष्पा कोकाटे, नेरकर मॅडम, शुभांगी येऊल, अश्विनी चंदन यांनी अथक परिश्रम घेतले तसेच आभार प्रदर्शन चौधरी सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन भाऊराव साबळे, अब्दुल बशीर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *