Join WhatsApp group

बेरोजगार प्रकल्पग्रस्तां साठी लढणारी एकमेव संघटना – राज्यमंत्री आशिष जयस्वाल.

गेल्या 25 वर्षापासून सतत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांसाठी लढा देणारे एकमेव संघटना या संघटनेचे कार्य अतुलनीय आहे असे प्रतिपादन पुनर्वसन राज्यमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेच्या नवीन चिन्हाचे अनावरण प्रसंगी केले. यावेळी त्यांनी संघटनेच्या मागणीकडे विशेष लक्ष देऊन तात्काळ मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी लाउन बेरोजगार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न हे नक्कीच मार्गी लावू असे आश्वासन दिले.
संघटनेचा लोभ हा अत्यंत मार्मिक असून आकाशात उडणाऱ्या गरुडाला साखर दंडाने जखडलेले आहे हा साखर दंड आपल्याला लवकरच सोडवायचा आहे आणि गरुडाला हवेत मनसोक्त उडाला पाहिजे.
रामटेके येथे एडवोकेट आशिष जयस्वाल यांच्या कार्यालयात सोहळा पार पडला.
या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे यांनी संघटने विषयी ची माहिती विशद केली 25 वर्षापासून बेरोजगार प्रकल्पग्रस्त हा एक समाज म्हणून वावरत असून एकजुटीने व तन-धनाने बेरोजगार प्रकल्पग्रस्तांविषयी च्या होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा देत आहेत अत्यंत विश्वास पात्र व एकनिष्ठ अशी ही राज्यातील एकमेव संघटना आहे यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष शुभम धोंदलकर अहिल्या नगरचे दिगंबर आवारे नागपूरचे ओम काडदाये तसेच भंडारा येथील प्रसन्न कालवडे हे उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *