गणेश उत्सवानिमित्त 53 किलो गटातील कबड्डीचे दणदणीत सामने पातूर तालुक्यातील पाचरण येथे दि. 02/09/2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. 3 दिवस चाललेल्या या सामान्य 04/09/2025 रोजी सांगता झाली यामध्ये छत्तीसगड राज्य मधून 1 कबड्डी संघ तर महाराष्ट्र राज्य मधून नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वाशीम, बुलढाणा, अकोला, जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कबड्डी संघ उपस्थित होते,
कार्यक्रमाच्या उद्घाटन व बक्षीस वितरण युवा लोकचळवळ चे संस्थापक/ अध्यक्ष अमोल घायवट, सुरेंद्र अवचार, लावण्य अतकर आदींची उपस्थिती होती. तसेच पाचरण व जांब येथील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये एकूण 5 बक्षीस ठेवण्यात आले होते,
1 बक्षीस वीर शिवाजी क्रीडा मंडळ बिलासपूर छत्तीसगढ यांनी पटकावले 2 बक्षीस जय मुंगसाजी संघ अंधारसांगवी 3 बक्षीस वाशिम प्रशिक्षण संघ वाशिम 4 बक्षीस जय बजरंग संघ पाचरण तर 5 बक्षीस जय बिरसा संघ टिटवा यांनी पटकावले आहे अकोल्या जिल्ह्यात प्रथमच पाऊस चालू असताना कबड्डीचे सामने ठेवण्यात आले होते.
पातूर तालुक्यातील पाचरण येथे श्री गणेश उत्सवानिमित्त 53 किलो गटातील कबड्डीचे दणदणीत सामने….
