अकोला – पर्यावरण संवर्धनाकरीता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करुन हरीत महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र करीता अथर्व मल्टीपर्पज फाऊंडेशन गोकुळ कॉलनी अकोला द्वारे “झाडे लावा झाडे जगवा” य आवाहनाला प्रतिसाद देत मागील चार वर्षांपासून पावसाळ्यात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्याचे काम करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून या वर्षी शहरातील व शहराच्या बाहेरील ही वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची हमी देणाऱ्या संस्था, शाळा व वृक्षप्रेमी व्यक्ति यांचे कडे महाबिज मधुन 8 फुट उंचीचे मोठे झाडे वड, पिंपळ, कडुलिंब, बकुळी, अशोकाची झाडे पोहचविण्यात आलीत व त्या त्या परीसरात वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये शहरातील नामांकित उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालगृहाचे हरताळकर सर व त्यांचे कर्मचारी यांचे सहकार्यातुन परीसरात 20 मोठी झाडे, ज्ञानदर्पण शाळा अमृत कलश विद्यालय न्यु खेतान नगर या परीसरात डॉ. पल्लवी कुळकर्णी व त्याचे कर्मचारी वर्ग विद्यार्थी एकुण 30 मोठी झाडे, पानझाडे साहेब सुधीर कॉलनी यांचे परीसरात एकुण 10 मोठी झाडे, डॉ..सचीन पारसकर याचे मांजरी गावातील बस स्टॅन्ड परीसरात 10 मोठी झाडे, कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालय आपोती येथील परीसरात प्राचार्य संजय गायकवाड सर व कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्याने एकुण 10 मोठी झाडे व श्री गणेशराव वाघ साहेब संचालक नवयुग विद्यालय वाडी अमडापुर येथील कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांचे सहकार्यातुन 15 मोठी झाडे असे एकुण 125 देशी झाडे लावून संबंधित व्यक्तींवर संवर्धनाची जवाबदारी सोपविण्यात आली.
प्रा. अनिल मुळे कुटुंबियांनी त्यांचा मुलगा स्व. अथर्वच्या संशयास्पद आकस्मिक मृत्युच्या दु:खातून सावरत अथर्वच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील वंचितांच्या सेवेकरिता त्यांचे नातेवाईक व स्व. अथर्वच्या मित्रमंडळींच्या सहकार्ऱ्याने स्व. अथर्व अनिल मुळे मल्टीपर्पज फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था तीन वर्षापुर्वी स्थापन केली आहे. या संस्थेद्वारे सतत वंचित पिडीतांची सेवा करण्याचा अल्पसा प्रयत्न करण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने उत्कर्ष शिशुगृहातील अनाथ चिमुकल्यांना दरमहा आवश्यक असलेली औषधी पुरवणे, हिवाळ्यात ब्लॅंकेट व कानटोपी वितरण, उन्हाळ्यात पाणपोई, पावसाळ्यात छत्री व रेनकोट वितरण, गरजुंकरिता मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीर, रक्तदान शिबीर, सुर्योदय बालगृह व आनंद आश्रमातील अनाथ मुलामुलींना मदत व अन्नदान, दिवाळीत फराळ वाटप व साड्या, कपडे वाटप ,वर्षभर गरजु शालेय विद्यार्थी यांना आवश्यक वह्या पुस्तके पेन वाटप , दरवर्षी सलग पाच दिवस सरकारी जिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे करिता अन्नदान करण्यात येते व वर्ष भर गरजु ना अन्नदान करणे ,या सह अनेक उपक्रम आयोजित करुन समाजातील वंचित व गरजू लोकांची सेवा करण्याचा अल्पसा प्रयत्न केला जातो.
या भव्य वृक्षारोपण प्रसंगी सर्वश्री डॉ.पल्लवी कुलकर्णी, डॉ. संजय गायकवाड, डॉ.सचीन पारसकर, श्रीमान गणेशराव वाघसाहेब, श्रीमान पानझाडे साहेब व मॅडम यांचे सह अथर्व फाऊंडेशनचे सर्वश्री मनोहरराव महल्ले साहेब, डॉ. सीमा मुळे, गणेशराव सहारे, पांडूरंग राऊत, सुनिलराव मुळे यांचे सह सर्व सभासद उपस्थित होते.

