Join WhatsApp group

समाजात समरस्तेची भावना असने काळाची गरज… आंनदीदास महाराज…

समाजातील जातींना एकत्र करून हिंदू धर्म हा एकनिष्ठ राहिला पाहिजे या उद्देशाने मार्गदर्शन करत प्रत्येक समाज नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेत आहेत त्याच अनुषंगाने आज लता पुष्प निवासस्थानी हिंदू खाटीक समाजाचे नेते सतुर सेना अध्यक्ष संजय धनाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली याप्रसंगी संजय धनाडे यांनी राजमान्य छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिलं चित्र साकारणारे 1970 मध्ये शासनाचे रॉयल्टी देवाची देवाच्या चित्राचे कोणी पैसे घेते का म्हणून नाकारणारे कलायोगी कांबळे व 1923 नागपूर येथे राजे रघुजी भोसले व डॉक्टर हेडगेवार डॉक्टर मुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू महासभेच्या वतीने पाच तोळे सोन्याचे पदक जीवन सन्मान करण्यात आलेल्या शूरवीर मायाराम दुर्गे यांचा सत्कार करण्यात आला होता अशा महापुरुषांच्या चित्राचे अनावरण करण्यासंबंधात चर्चा करण्यात आली या प्रसंगी आनंदीदास महाराज यांनी अत्यंत कौतुकास्पद व ऐतिहासिक माहिती प्राप्त झाल्याबद्दल हा विषय प्रसिद्धी करण्याबाबत सांगितले तसेच विभागीय प्रचारक दीपक वाड्मेजी यांनी हिंदू दलितातील समाजातील लपलेल्या कर्तबगार थोर पुरुषांचा इतिहास शोधून काढण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचे सांगितले..
यावेळी आनंदीदास महाराजांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व समाज विषयी सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी डॉक्टर विजय शास्त्री सोनकर लिखित हिंदू खाटीक समाजाचे पुस्तक अनावरण केलेले पुस्तक देण्यात आले.यावेळी सारंग जी करे हे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *