अकोला – स्थानिक खदान सिंधी कॅम्प येथे राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात काशिनाथ बागडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली व त्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दीपमाला आर. कांबळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मुन्ना पांडे, राष्ट्रीय सचिव संजना कांबळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या जनसेवेच्या कार्याची दखल घेऊन काशिनाथ बागडे यांना जबाबदारी देण्यात आली. यावेळी नागरिक, मित्रपरिवार व समाजातील विविध घटकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय रेल्वे यात्री संघ सोशल वेलफेयर फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी काशिनाथ बागडे यांची नियुक्ती
